मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Earthquake : हिंगोलीत 4.5 तीव्रतेचा भूकंप, परभणी, नांदेडमध्येही भूकंप

Maharashtra Earthquake News: हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Earthquake : हिंगोलीत 4.5 तीव्रतेचा भूकंप, परभणी, नांदेडमध्येही भूकंप

Maharashtra Earthquake News: हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. या काळात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, लोक घराबाहेर पडले.

ANI :- हिंगोलीत Hingoli Earthquake News आज सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी 4.5रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले. याशिवाय परभणी आणि नांदेडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. Maharashtra Earthquake Latest News

यापूर्वी 21 मार्च रोजीही हिंगोलीत भूकंपाचे धक्के Hingoli Earthquake जाणवले होते. 10 मिनिटांच्या कालावधीत पृथ्वी दोनदा हादरली. भूकंपाचा पहिला हादरा सकाळी 6.08 वाजता, तर दुसरा हादरा 6.19 वाजता जाणवला. पहिल्या भूकंपाची तीव्रता 4.5 नोंदवण्यात आली, तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजण्यात आली. भूकंपाचे धक्के जाणवत असताना बहुतांश लोक झोपले होते. Maharashtra Earthquake Latest News

भूकंपाचा पहिला धक्का इतका जोरदार होता की झोपलेले लोकही जागे झाले आणि घराबाहेर पडले. या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. Maharashtra Earthquake Latest News

हेही वाचा: Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्यपालाच्या भेटीला

शेअर करा