मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Budget Session 2026 : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

•सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच सभागृहात | चहापानावर बहिष्कार टाकत महाविकास आघाडी आक्रमक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Budget Session 2026 : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

•सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच सभागृहात | चहापानावर बहिष्कार टाकत महाविकास आघाडी आक्रमक

मुंबई :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या बहुप्रतीक्षित अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून वादळी वातावरणात सुरुवात होत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने राजकीय वर्तुळात मोठी संवेदनशीलता पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांच्या कार्यकाळातील हे पहिलेच अधिवेशन असल्याने, सभागृहात त्या कशा प्रकारे सरकारची बाजू मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या पारंपारिक चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. अजित पवार अपघात प्रकरणातील संशयास्पद बाबी, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत संघर्षाचे आणि वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

अधिवेशनाचे आजचे वेळापत्रक:

अधिवेशनाची सुरुवात सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची (विधानसभा आणि विधानपरिषद) संयुक्त बैठक पार पडणार असून राज्यपाल सरकारची आगामी धोरणे मांडतील. अभिभाषण संपल्यानंतर 20 मिनिटांची विश्रांती दिली जाईल आणि त्यानंतर विधानसभेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल.

हेही वाचा: Vasai Crime News : मोबाईल दुकानावर डल्ला मारणारा अट्टल घरफोड्या जेरबंद; गुन्हे शाखा कक्ष-2 कडून 15 लाखांचे 83 मोबाईल जप्त

शेअर करा