मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुरस्कारातून प्रेरणा, व्यवसायातून स्वावलंबनाचा संदेश; महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा 2026 संपन्न

Pune News : पुणे : पत्रकार भवन येथे आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित “महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा 2026” हा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुरस्कारातून प्रेरणा, व्यवसायातून स्वावलंबनाचा संदेश; महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा 2026 संपन्न
पुरस्कारातून प्रेरणा, व्यवसायातून स्वावलंबनाचा संदेश; महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा 2026 संपन्न

Pune News : पुणे : पत्रकार भवन येथे आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित “महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा 2026” हा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाज, उद्योग, कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, शिक्षण आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News

कार्यक्रमास मॉडेल | सिने अभिनेत्री | टेलिव्हिजन कलाकार मा. अक्षता राजेंद्र खरटमोल यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. अक्षता यांनी मुक्ताई, अभंग तुकाराम यांसारख्या चित्रपटांसह ज्ञानेश्वर माऊली आणि आशीर्वाद तुझा एकवीरा आई यांसारख्या मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. तसेच उद्योजक अभिषेक बोत्रे यांची विशेष उपस्थिती लाभली.https://maharashtramirror.com/ Pune News

आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक गणेश विटकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण सन्मान 2026” प्रदान करून गौरविण्यात आले. समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी बोलताना गणेश विटकर यांनी युवकांना नोकरीपेक्षा व्यवसाय आणि उद्योजकतेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. “स्वतःच्या कौशल्यावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवून व्यवसाय उभारल्यास केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण होत नाहीत, तर इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करता येतात. युवकांनी नोकरी शोधण्याबरोबरच रोजगार निर्माण करण्याचा विचार केला पाहिजे,” असा संदेश त्यांनी दिला.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे आभार मानले. एकूणच, “महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा 2026” हा कर्तृत्वाचा गौरव, सामाजिक बांधिलकी आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा संस्मरणीय सोहळा ठरला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा