मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mahadevi Elephant : नांदणी मठातील 'महादेवी' हत्तीणीच्या परतीसाठी सरकारचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

•मुख्यमंत्र्यांनी 'वनतारा'च्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mahadevi Elephant : नांदणी मठातील 'महादेवी' हत्तीणीच्या परतीसाठी सरकारचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

•मुख्यमंत्र्यांनी 'वनतारा'च्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

मुंबई :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील 'माधुरी' उर्फ 'महादेवी' हत्तीणीला गुजरातच्या 'वनतारा पशूसंवर्धन केंद्रातून' परत आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (5 ऑगस्ट) जाहीर केल्यानुसार, नांदणी मठाला पाठिंबा देत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. या संदर्भात, आज (6 ऑगस्ट) त्यांनी 'वनतारा'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परतीचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' निश्चित केला.

या बैठकीनंतर फडणवीस यांनी समाजमाध्यमांवरून माहिती दिली. ते म्हणाले की, वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली.महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.

या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकार न्यायालयात स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडेल आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सर्व निकष पूर्ण करून महादेवीच्या काळजीसाठी विशेष पथक तयार करेल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. या निर्णयामुळे नांदणी मठातील हत्तीणीच्या परतीची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे.

हेही वाचा: Navi Mumbai News : खारघरमध्ये गणेशोत्सव वर्गणीवरून वाद; 'मराठी येत नाही' म्हणणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला माफी मागायला लावली

शेअर करा