मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : खारघरमध्ये गणेशोत्सव वर्गणीवरून वाद; 'मराठी येत नाही' म्हणणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला माफी मागायला लावली

•गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी मागितल्यावर दुकानदाराकडून मुजोरी; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेची इंट्री!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : खारघरमध्ये गणेशोत्सव वर्गणीवरून वाद; 'मराठी येत नाही' म्हणणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला माफी मागायला लावली

•गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी मागितल्यावर दुकानदाराकडून मुजोरी; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेची इंट्री!

नवी मुंबई :- गणेशोत्सवाच्या तोंडावर नवी मुंबईतील खारघरमध्ये वर्गणीवरून मोठा वाद झाला आहे. एका परप्रांतीय दुकानदाराने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना वर्गणी देण्यास नकार देताना, 'मराठी माणसांमुळे माझं दुकान चालत नाही', 'मला मराठी येत नाही आणि शिकायचीही नाही' अशी मुजोरी केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मनसेने यात हस्तक्षेप केला आणि त्यानंतर संबंधित दुकानदाराने माफी मागितली.

मिळालेल्या माहितीनुसार, खारघरमधील एक गणेश मंडळ वर्गणी गोळा करत असताना एका दुकानदाराने वाद घातला. त्याने मराठी भाषेबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नंतर स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची लाट पसरली. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन या कृत्याचा निषेध केला. वातावरण अधिक चिघळण्यापूर्वीच दुकानदाराने माफी मागून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वीही खारघरमध्ये अशाच प्रकारे एका पिठाच्या गिरणी चालकाने दुकानाच्या पाटीवर मराठी लिहिण्यास नकार दिला होता. 'मराठी बोलना जरुरी है क्या सबको?' असे विधान करत त्याने स्थानिकांना डिवचले होते. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नवी मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात मराठी आणि अमराठी लोकांमध्ये तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. सण-उत्सवांच्या काळात अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: Panvel News : करंबेली जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची दुरवस्था: शिक्षकांच्या बेजबाबदारीने आदिवासी पालक संतप्त, कारवाईच्या प्रतीक्षेत

शेअर करा