मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mahadev Munde Case : परळीतील महादेव मुंडे हत्याप्रकरणी एसआयटी स्थापन, मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा आदेश!

•हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याचे निर्देश; 'कुणीही असो, सोडणार नाही' मुख्यमंत्र्यांचा शब्द

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mahadev Munde Case : परळीतील महादेव मुंडे हत्याप्रकरणी एसआयटी स्थापन, मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा आदेश!

•हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याचे निर्देश; 'कुणीही असो, सोडणार नाही' मुख्यमंत्र्यांचा शब्द

मुंबई :- परळी येथे दोन वर्षांपूर्वी, 21 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना दिला आहे.

आज महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गेल्या 21 महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षाची आणि पोलिसांच्या उदासीनतेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकल्यावर ते भावुक झाले. त्यांनी तात्काळ बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना अटक करण्याचे आदेश दिले."

महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा तसेच 'कराड गँग'चे इतर सदस्य सहभागी असल्याचा आरोप आहे, मात्र पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. "पोलीस प्रशासनाला परळीतील एका बंगल्यावरून फोन आला आणि त्यांनी तपास थांबवला. तो फोन धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने केला होता," अशी धक्कादायक माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली. त्यांनी या फोन कॉलचा सीडीआर काढून त्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्याची विनंती केली. हत्येत सहभागी असलेल्या काही लोकांची नावेही आपण मुख्यमंत्र्यांना दिली असून, "कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, सगळ्यांना अटक करणार," असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी नमूद केलं.

हेही वाचा: Devendra Fadnavis : मालेगाव स्फोटात निर्दोष सुटका : फडणवीसांचा काँग्रेसवर गंभीर आरोप, 'हिंदू समाजाची माफी मागा!'

शेअर करा