मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : मालेगाव स्फोटात निर्दोष सुटका : फडणवीसांचा काँग्रेसवर गंभीर आरोप, 'हिंदू समाजाची माफी मागा!'

• तत्कालीन यूपीए सरकारवर 'हिंदू दहशतवादाचा नॅरेटिव्ह सेट केल्याचा' ठपका; उद्धव ठाकरेंनाही लक्ष केले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis, Maharashtra News, Radhakrishna Vikhe Patil, Mahayuti, Maharashtra Politics, BJP, Shiv Sena, NCP, Eknath Shinde, Ajit Pawar, Loan Wavering Scheme, Padmashree Vikhe Patil Cooperative Factory, Padmashree Vikhe Patil Sahkari Karkhana,देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र न्यूज, राधाकृष्ण विखे पाटील, महायुति, बीजेपी, शिवसेना, एनसीपी, एकनाथ शिंदे, अजित पवार

•तत्कालीन यूपीए सरकारवर 'हिंदू दहशतवादाचा नॅरेटिव्ह सेट केल्याचा' ठपका; उद्धव ठाकरेंनाही लक्ष केले

मुंबई :- 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही आरोपींना विशेष न्यायालयाने गुरूवारी (आज) निर्दोष मुक्त केल्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारवर त्यांनी 'हिंदू दहशतवादाचा नॅरेटिव्ह' तयार केल्याचा गंभीर आरोप करत, संपूर्ण हिंदू समाजाची जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू आतंकवादाचा, भगव्या आतंकवादाचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगूनचालन करण्यासाठी हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा प्रचार केला होता. तो प्रचार किती खोटा होता हे आज उघड झालं आहे." त्यांनी पुढे म्हटले की, "ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, तो प्रयत्न किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्यानिशी सांगितलं आहे."

फडणवीस यांनी मागणी केली की, "मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ज्यांच्यावर यूपीए सरकारने कारवाई केली होती, त्यांची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. तसेच संपूर्ण हिंदू समाजाची देखील काँग्रेसने माफी मागितली पाहिजे, ज्या प्रकारे भगवा आतंकवाद दाखवून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला."

बॉम्बस्फोट कोणी केला, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "हे पोलीस सांगतील. तसेच त्या वेळच्या तपास यंत्रणांनी काय तपास केला हे विचारावं लागेल. आता सर्वांना कल्पना आहे की, उद्धव ठाकरे आता ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत, त्यांचं सरकार (काँग्रेस) त्यावेळी होतं. त्यामुळे त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे." भगव्या आतंकवादाचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करायला पाहिजे होते, मात्र ते 'लांगूनचालन' करणाऱ्यांबरोबर गेल्याने असं करणार नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

हेही वाचा: Pune Police Transfer Order : पुण्यात पोलीस दलात मोठे बदल: युसूफ शेख यांची सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती!

शेअर करा