मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Lok Sabha Session : लोकसभेत संविधान हातात घेऊन विरोधी पक्षाच्या खासदारांनी घेतली शपथ

Lok Sabha Session : काँग्रेसच्या बहुतांश खासदारांनी आज संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Lok Sabha Session

Lok Sabha Session : काँग्रेसच्या बहुतांश खासदारांनी आज संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली. या वेळी कार्यवाहक सभापती भर्त्रीहरी महताब यांनी सभागृहाचे कामकाज चालवले.

ANI :- अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन (18th Lok Sabha First Session ) सुरू झाले आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, PM Modi त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य तसेच इतर नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या बहुतांश खासदारांनी हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली. कार्यवाहक अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) भर्त्रीहरी महताब यांनी सभागृहाचे कामकाज चालवले आणि सदस्यांना शपथ दिली. (18th Lok Sabha First Session )

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद गट आणि शिवसेनेच्या उद्धव गटाच्या खासदारांनी वेगवेगळ्या भाषेत शपथ घेतली. कोणी हिंदीत तर कोणी मराठीत शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचे नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोवळ कागद पाडवी, काँग्रेसच्या धुळ्याच्या खासदार बच्चव शोभा दिनेश आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हातात संविधानाची प्रत होती. (18th Lok Sabha First Session )

हेही वाचा: Nilesh Lanke : अहमदनगर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी थेट इंग्रजी मधून खासदारकीची शपथ घेतली

शेअर करा