मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका ; ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची टीका

Vinayak Raut On Raj Thackeray : मनसे नेत्यांकडून विनायक राऊत यांना इशारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vinyak Raut On Sanjay Raut

Vinayak Raut On Raj Thackeray : मनसे नेत्यांकडून विनायक राऊत यांना इशारा

रत्नागिरी :- राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका आहे अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak raut) यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या (raj thackeray) सभेमुळे कोकणात काही फरक पडणार नाही, असे म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला मनसे नेते अमेय खोपकर यांनी चोख प्रत्युत्तर दिल आहे. ‘ राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढं लक्षात असू दे. ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान… ‘ असं म्हणत अमेय खोपकर (Amay Khopkar) यांनी विनायक राऊत आणि संजय राऊत यांना इशारा दिला आहे. (Ratnagiri Sindhudurg loks abha constituency) 

अमेय खोपकर यांनी ट्विट करत विनायक राऊत यांना थेट इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून एक ट्विट करत अेय खोपकरांनी विनायक राऊत आणि संजय राऊत यांना चांगलंच सुनावलं.

अमेय खोपकर यांचं ट्विट जसंच्या तसं..

राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. जनतेच्या कल्याणाचं कोणतंही काम न करणारे खासदार राऊत असोत किंवा रडत राऊत असोत, तुम्ही आमच्या साहेबांवर खालच्या पातळीची टीका करणार असाल तर आम्ही मनसैनिक ते खपवून घेणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढं लक्षात असू दे. ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान… आता होऊनच जाऊ दे.

संदीप देशपांडेंनीही दिलं प्रत्युत्तर

दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही विनायक राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर पलटवार केला. ‘ आम्ही फुसकी लवंगी आहोत, इलेक्ट्रिक माळ की ॲटम बॉम्ब आहोत, हे 4 जूनला ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे त्यांना कळेल. पण एक नक्की, यांचा फुगा फाटला आहे, रोज उद्धव ठाकरे त्यांच्यामध्ये हवा भरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या फाटलेल्या फुग्याने आमच्याबद्दल बोलायची गरज नाही. त्यांनी स्वत:चं बघावं आणि पवार साहेबांकडून त्यांच्या फुग्याला ठिगळं लावून घ्यावीत’ असं म्हणत संदीप देशपांडे यांनीही राऊत यांच्या टीकेला प्रत्युतर दिलं.

शेअर करा