मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Lok Sabha Election 2019 Result : महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुका कधी झाल्या, कोणी किती जागा जिंकल्या?

Lok Sabha Election 2019 Result : निवडणूक आयोग उद्या लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर करणार आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Lok Sabha Election 2019 Result

Lok Sabha Election 2019 Result : निवडणूक आयोग उद्या लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात मागची निवडणूक कधी झाली आणि कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या? जाणून घ्या

मुंबई :- लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election कधी आणि किती टप्प्यात होणार हे निवडणूक आयोग उद्या दुपारी 3 वाजता जाहीर करणार आहे. उद्या 2024 च्या निवडणुकीसाठी संपूर्ण कार्यक्रमांची यादी प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुका कधी झाल्या, त्यात कोणी किती जागा जिंकल्या आणि कोणाला पराभवाला सामोरे जावे लागले याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2019 अतिशय रंजक होती. (Lok Sabha Election 2019 Result)

2019 च्या लोकसभा निवडणुका 48 जागांसाठी चार टप्प्यात पार पडल्या.

  • पहिला टप्पा - 11 एप्रिल 2019 रोजी 7 जागांसाठी निवडणूक झाली.
  • दुसरा टप्पा - 18 एप्रिल 2019 रोजी 10 जागांसाठी निवडणुका झाल्या.
  • तिसरा टप्पा - 23 एप्रिल 2019 रोजी 14 जागांवर निवडणुका झाल्या.
  • चौथा टप्पा - 29 एप्रिल 2019 रोजी 17 जागांवर निवडणुका झाल्या.
  • कोणत्या पक्षाची कामगिरी कशी झाली?

    महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 41 जागा जिंकत भाजप आणि शिवसेना युतीचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 4 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला (INC) फक्त एक जागा जिंकता आली होती.

    23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या, त्यानंतर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या, NCP-4, काँग्रेस-1, AIMIM-1 आणि 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम उद्या जाहीर होणार आहे. 2024 च्या निवडणुका सहा किंवा सात टप्प्यांत होऊ शकतात.

    शेअर करा