मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; 'तो' क्षण पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटला

• 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने लालबाग परिसर दुमदुमला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; 'तो' क्षण पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटला

• 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने लालबाग परिसर दुमदुमला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मुंबई :- गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा आज (शनिवार) शेवटचा दिवस आहे. याच दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो क्षण अखेर आला आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये अग्रगण्य असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. राजा मंडपातून बाहेर येताच भाविकांचा एकच जल्लोष सुरू झाला.

सकाळपासूनच लालबाग परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात लालबागचा राजा मंडपातून बाहेर आला. हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

राजा मंडपातून बाहेर येताच भक्तांच्या डोळ्यांत भावनिक अश्रू तर ओठांवर बाप्पाचा जयघोष होता. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तीचा महासागर या सगळ्यांमध्ये बाप्पाचा निरोप घेतला जात आहे. मिरवणुकीत राजाचा मनमोहक देखावा अधिकच खुलून दिसत आहे.

हेही वाचा: अजित पवारांच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडिओमुळे नवा ट्विस्ट; आमदार अमोल मिटकरींनी आयपीएस अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची चौकशीची केली मागणी

शेअर करा