मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kondhwa Gang Rape | कोंढवा : तरुणीचे अपहरण करून गँगरेप : संशयित आरोपींचे स्केच आले समोर

Kondhwa Gang Rape

M
mubarak

1 मिनिट वाचन

kondhwa gang rape

  • कोंढव्यात संतापाचे वातावरण | Kondhwa Gang Rape
  • पुणे, दि. ४ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Kondhwa Gang Rape

    Kondhwa Gang Rape | कोंढवा हद्दीतील बोपदेव घाट परिसरात एका तरुणीचे अपहरण करून तिचा गँगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या गँगरेप वरून कोंढव्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. पुण्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच आता अपहरण गँगरेप सारखा धक्कादायक प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्था मोडकीस आल्याचे दिसते.

    गँगरेप करणाऱ्या संशयित आरोपींचे स्केच पोलिसांनी तयार केले असून याबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी कि, मित्राबरोबर फिरायला गेलेल्या २० वर्षीय तरुणीचे तिघांनी मानव अधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे भासवून अपहरण केले यानंतर तिघा नराधमांनी तिच्यावर गँगरेप केला. सदर धक्कादायक प्रकार आज पहाटे उघडकीस आला. तक्रार दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जमाव पोलीस ठाण्याच्या बाहेर जमला होता.

    सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा Jt.CP. Ranjankumar Sharma यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती देताना सांगितले कि, बोपदेव घाटात तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला आहे. पहाटे पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी १० पथके रवाना करण्यात आली आहेत.

    हेही वाचा: Mumbai Breaking News : सीएसएमटी स्थानकाबाहेर महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंड दाबून आरोपींनी तिला टॅक्सी स्टँडच्या मागे नेले.

    हेही वाचा: Share Market Scam | ससाणेनगर येथे शेअर मार्केट घोटाळा, तब्बल ६ कोटींची फसवणूक

    शेअर करा