मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime: मालकाची २८ लाखांची रोख रक्कम घेऊन कामगार पसार

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्टीलच्या गोदामात काम करणाऱ्या कामगारानेच आपल्या साथीदाराच्या मदतीने मालकाचा विश्वासघात करत २८ लाख रुपयांची रोख रक्कम पळवल्याची घटना घडली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

मालकाची २८ लाखांची रोख रक्कम घेऊन कामगार पसार कोंढवा पोलिसांकडून दोघांना अटक
मालकाची २८ लाखांची रोख रक्कम घेऊन कामगार पसार कोंढवा पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime: कोंढवा पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्टीलच्या गोदामात काम करणाऱ्या कामगारानेच आपल्या साथीदाराच्या मदतीने मालकाचा विश्वासघात करत २८ लाख रुपयांची रोख रक्कम पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शाकीब अयुब मोमीन (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि सुरेश बिचप्पा पुजारी (वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महंमदवाडी येथील २६ वर्षीय व्यापाऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयबीएम रस्ता, कोंढवा येथील एव्हरजॉय सोसायटीसमोर तक्रारदाराचे स्टीलचे गोदाम आहे. २७ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास, व्यापाऱ्याच्या गोदामात काम करणाऱ्या कामगाराने आणि त्याच्या साथीदाराने संगणमत केले. रिटेल विक्रेत्यांकडून जमा झालेली स्टीलच्या बिलाची तब्बल २८ लाख रुपयांची रोख रक्कम गोदामात जमा करायची होती. मात्र, आरोपींनी ही मोठी रक्कम स्वतःकडे ठेवून मालकाचा विश्वासघात केला आणि रोकडसह पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून दोन्ही आरोपींना गजाआड केले. महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime

शेअर करा