मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kirit Somaiya : मुंबईत भाजपचा 'फेरीवाला मुक्त' एल्गार! मुलुंडमधून मोहिमेला सुरुवात; बांगलादेशी घुसखोरांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक

•रेल्वे स्थानकांचा 100 मीटर परिसर होणार मोकळा; पुढील 15 दिवसांत ईशान्य मुंबईतील उपनगरांमध्ये धडक कारवाईचा इशारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kirit Somaiya : मुंबईत भाजपचा 'फेरीवाला मुक्त' एल्गार! मुलुंडमधून मोहिमेला सुरुवात; बांगलादेशी घुसखोरांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक

•रेल्वे स्थानकांचा 100 मीटर परिसर होणार मोकळा; पुढील 15 दिवसांत ईशान्य मुंबईतील उपनगरांमध्ये धडक कारवाईचा इशारा

मुंबई | मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद आणि बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या संख्येविरोधात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात आज मुलुंड येथून 'बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई' अभियानाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या मोहिमेमुळे मुंबईच्या राजकीय वातावरणात मोठी ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

मुलुंडमधून मोहिमेचा श्रीगणेशा

आज सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात किरीट सोमय्या, माजी खासदार मनोज कोटक आणि आमदार मिहीर कोटेचा यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. रेल्वे स्थानक परिसर प्रवाशांसाठी चालण्यायोग्य करणे आणि अनधिकृत घुसखोरांनी केलेले अतिक्रमण हटवणे हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

100 मीटरचा नियम आणि 'मुंब्रा' टार्गेट

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या आणि प्रशासकीय नियमांनुसार रेल्वे स्थानकापासून 100 मीटरच्या परिघात एकही फेरीवाला बसता कामा नये. या नियमाची पायमल्ली करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल. आमचे मुख्य लक्ष मुंबईतील मुंब्रा आणि ज्या भागांत बांगलादेशी माफियांनी पाय पसरले आहेत, तो परिसर फेरीवाला मुक्त करण्यावर आहे."

हेही वाचा: RCB चं 'ई साला कप नम्दे'! स्मृती मानधनाचं वादळ धडकलं; दिल्लीचा धुव्वा उडवत बंगळुरूने दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी

शेअर करा