मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

RCB चं 'ई साला कप नम्दे'! स्मृती मानधनाचं वादळ धडकलं; दिल्लीचा धुव्वा उडवत बंगळुरूने दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी

•204 धावांचे रेकॉर्डब्रेक आव्हान आरसीबीने लीलया पेलले; स्मृती मानधना 87 धावांसह 'ऑरेंज कॅप'ची मानकरी, जेमिमाची झुंज अपयशी

V
Vivek

2 मिनिट वाचन

RCB चं 'ई साला कप नम्दे'! स्मृती मानधनाचं वादळ धडकलं; दिल्लीचा धुव्वा उडवत बंगळुरूने दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी

•204 धावांचे रेकॉर्डब्रेक आव्हान आरसीबीने लीलया पेलले; स्मृती मानधना 87 धावांसह 'ऑरेंज कॅप'ची मानकरी, जेमिमाची झुंज अपयशी

मुंबई | महिला प्रीमियर लीग 2026 (WPL 2026) च्या थरारक अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) इतिहास रचला आहे. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेले 204 धावांचे डोंगरसदृश आव्हान आरसीबीने 6 गडी राखून पूर्ण केले आणि दुसऱ्यांदा जेतेपदावर आपले नाव कोरले. कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया वोल यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळींच्या जोरावर बंगळुरूने हा ऐतिहासिक विजय साकारला.

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

दिल्लीचा 'विशाल' डोंगर: जेमिमाची कर्णधारी खेळी

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने अंतिम सामन्याच्या दबावातही सर्वोच्च धावसंख्या उभारली. लिजेल ली (37 धावा), शफाली वर्मा (20 धावा) आणि लॉरा वोल्वार्ड्ट (44 धावा) यांनी दिलेल्या आक्रमक सुरुवातीचा फायदा घेत कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने 57 धावांची तुफानी खेळी केली. शिनेल हेनरीनेही शेवटच्या षटकांत नाबाद 35 धावा कुटल्यामुळे दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 203 धावांपर्यंत मजल मारली.

स्मृती-जॉर्जियाची ऐतिहासिक भागीदारी

204 धावांचे कठीण लक्ष्य गाठताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ग्रेस हॅरिस केवळ 9 धावांवर बाद झाली. मात्र, त्यानंतर मैदानावर स्मृती मानधना आणि जॉर्जिया वोल नावाचे वादळ घोंगावले. स्मृती मानधनाने 87 धावांची विरश्री खेळी केली, तर जॉर्जिया वोलने 79 धावांचे मोलाचे योगदान दिले. या दोघींच्या शतकी भागीदारीने दिल्लीच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले आणि डब्ल्यूूपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग (Run Chase) पूर्ण केला.

स्मृती मानधनाचा डबल धमाका: ऑरेंज कॅप आणि ट्रॉफी

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिच्यासाठी हा हंगाम स्वप्नवत ठरला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करत तिने सर्वाधिक धावा केल्या आणि मानाची 'ऑरेंज कॅप' आपल्या नावावर केली. दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावल्यानंतर आरसीबीच्या गोटात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यापासून चॅम्पियनसारखा खेळ करणाऱ्या आरसीबीने खऱ्या अर्थाने या जेतेपदावर आपला हक्क सिद्ध केला.

सामन्याचे धावते स्कोअरकार्ड

दिल्ली कॅपिटल्स: 203/4 (20 षटके) - जेमिमा रॉड्रिग्ज 57, लॉरा वोल्वार्ड्ट 44.

आरसीबी: 207/4 (19.3 षटके) - स्मृती मानधना 87, जॉर्जिया वोल 79.

निकाल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 6 गडी राखून विजयी.

हेही वाचा: RBI Repo Rate : कर्जदारांना मोठा दिलासा! आरबीआयने रेपो दर 5.25 टक्क्यांवर ठेवला स्थिर; ईएमआय वाढणार नाही

शेअर करा