मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kia New Innovation : हाय-टेक, स्मार्ट नेव्हीगेशनसाठी किया इंडियाची मॅप माय इंडियाशी हातमिळवणी

मुंबई : भारताची आघाडीची प्रीमियम मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता कंपनी कियाने देशभरातील कियाच्या ग्राहकांना हाय-टेक, स्मार्ट नेव्हीगेशन Kia New Innovation प्रदान करण्यासाठी मॅप माय इंडियाशी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kia New Innovation

मुंबई : भारताची आघाडीची प्रीमियम मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता कंपनी कियाने देशभरातील कियाच्या ग्राहकांना हाय-टेक, स्मार्ट नेव्हीगेशन Kia New Innovation प्रदान करण्यासाठी मॅप माय इंडियाशी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले आहे. माय किया आणि किया कनेक्ट मंचांशी एकीकृत केलेले ही धोरणात्मक भागीदारी वापरकर्त्यांना आत्मविश्वासाने प्रवास करण्यासाठी सक्षम करणारी अचूक लोकेशन सेवा आणि व्यापक स्थान शोध वैशिष्ट्यासह वापरकर्त्यांसाठी ड्रायव्हिंगच्या अनुभवास पुन्हा व्याख्यायित करते. या मंचावरील चारचाकी विशिष्ट पॉइंट ऑफ इंटरेस्ट सर्च ४५० वर्गांमध्ये व्याप्त असून विक्रेते आणि सर्व्हिस सेंटर्स, पेट्रोल पंप, हॉस्पिटल, हॉटेल्स, उपाहारगृहे आणि इतर महत्त्वाच्या सेवा सहज शोधण्यास मदत करतो.

शिवाय, ड्रायव्हर्सना ड्रायव्हिंग करत असताना स्पीड लिमिट इशारे, रियल टाइम अडचणीच्या सूचना (उदा. पाणी साचून राहणे, रस्त्याचे काम सुरू असणे, ट्राफिक जॅम, इ.) मिळतील आणि आपल्या आवाजाने नेव्हीगेशन करण्याची सुविधा देखील मिळेल. ही वैशिष्ट्ये आणि त्याला पूरक असे डायनॅमिक रियल टाइम सुरक्षा इशारे यामधून आपल्या ग्राहकाची सुरक्षा आणि टेक-सक्षम सुधारित ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करण्याची कियाची निष्ठा पुन्हा पुन्हा दिसून येते.

किया इंडियाचे Kia New Innovation चीफ सेल्स ऑफिसर श्री. म्युंग-सिक सोन म्हणाले, “कियामध्ये आम्ही सतत अशी भागीदारी करण्याच्या शोधात असतो, जी आमच्या इनोव्हेशन आणि ग्राहक संतोषाच्या वचनबद्धतेशी मिळती जुळती असेल. मॅप माय इंडियाशी केलेल्या भागीदारीमुळे आमच्या नव्या जमान्याच्या ग्राहकांना ड्रायव्हिंगचा आणखी सुलभ अनुभव देण्यासाठी समर्पित असा टेक-प्रगत ब्रॅंड म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.

हेही वाचा: MLA Kiran Sarnaik Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या नातेवाईकासह सहा जणांचा मृत्यू

शेअर करा