मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kharghar Fire : खारघरच्या ट्रायसिटी इमारतीला भीषण आग; 10 ते 14 व्या मजल्यावर हाहाकार

• शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; चार रहिवाशांना श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kharghar Fire : खारघरच्या ट्रायसिटी इमारतीला भीषण आग; 10 ते 14 व्या मजल्यावर हाहाकार

•शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; चार रहिवाशांना श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल

खारघर (नवी मुंबई) :- खारघर उपनगरातील सेक्टर 34 मध्ये असलेल्या ट्रायसिटी इमारतीमध्ये रविवारी दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. रविवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी इमारतीच्या 10 व्या मजल्यापासून ते 14 व्या मजल्यापर्यंत ही आग पसरली.

धुरामुळे चार जण जखमी

वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. इमारतीतून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागताच खारघर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्काळ मदतकार्य हाती घेत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, धुरामुळे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास झाल्याने चार रहिवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सुमन कुमारी नीरज भारद्वाज (31 वय), वाणीच नीरज भारद्वाज (9 वय), तेजस्वी राजेश कुमार सिंग (19 वय) आणि यशस्वी राजेश कुमार सिंग (16 वय) यांचा समावेश आहे. सर्वांना खारघर येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य हाती घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या आग कशामुळे लागली याचा पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत.

हेही वाचा: Mumbai News : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा होणारच; 'परिपत्रक' बनावट असल्याचा खुलासा

शेअर करा