मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा होणारच; 'परिपत्रक' बनावट असल्याचा खुलासा

• 14 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai News : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा होणारच; 'परिपत्रक' बनावट असल्याचा खुलासा

• 14 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मुंबई :- मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एक बनावट परिपत्रक समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे. मात्र, हे परिपत्रक पूर्णतः खोटे असून, विद्यापीठाने असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थी आणि संबंधितांना आवाहन केले आहे की, त्यांनी या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये.

कोणत्या परीक्षा नियोजित वेळेवर?

14 ऑक्टोबरपासून तृतीय वर्ष सत्र 5 च्या महत्त्वाच्या परीक्षा सुरू होत आहेत. यात प्रामुख्याने तृतीय वर्ष बी.कॉम., बीएमएस, बी.कॉम.च्या 'अकाउंटिंग अँड फायनान्स', 'बँकिंग अँड इन्श्युरन्स', 'फायनान्शिअल मार्केट' यासह विविध शाखांच्या परीक्षांचा समावेश आहे.परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन परीक्षेची तयारी करावी, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Thane News : गुन्हे शाखेचा ठाण्यात हाय प्रोफाईल 'सेक्स रॅकेट'वर छापा

शेअर करा