मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Eknath Khadse VS Girish Mahajan : खडसे-महाजन यांच्यात 'सिडीं'वरून जुंपली; 'तुम्ही नव्हे, महाजनांना जोडे मारा'

Eknath Khadse VS Girish Mahajan : जावयावरील आरोपांवरून खडसेंचा भाजपवर पलटवार; 'विषारी पिल्लांना मोठं केल्याचं दुःख'

V
Vivek

1 मिनिट वाचन

Eknath Khadse VS Girish Mahajan : खडसे-महाजन यांच्यात 'सिडीं'वरून जुंपली; 'तुम्ही नव्हे, महाजनांना जोडे मारा'

Eknath Khadse VS Girish Mahajan : जावयावरील आरोपांवरून खडसेंचा भाजपवर पलटवार; 'विषारी पिल्लांना मोठं केल्याचं दुःख'

जळगाव :- माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा उफाळून आले आहे. Eknath Khadse VS Girish Mahajan राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खडसे यांच्या जावयावर गंभीर आरोप केल्यानंतर, खडसेंनी देखील भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जळगावच्या जामनेरमध्ये भाजपने केलेल्या आंदोलनाला उत्तर देताना खडसे यांनी थेट महाजन यांनाच लक्ष्य केले आहे.

महाजनांच्या सिड्या प्रफुल लोढाकडे'

भाजपने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले, "मला कशाला आंदोलन करून जोडे मारता, गिरीश महाजन यांना जोडे मारा. त्यांचे अनेक व्हिडिओ प्रफुल लोढाकडे आहेत." यासोबतच, "मी एका पदाधिकाऱ्याला विचारले, तुम्ही आंदोलन का केले? तर तो म्हणाला, 'वरून आदेश आहेत म्हणून'." असे सांगत त्यांनी भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली.

विषारी पिल्लांना मोठं केल्याचं दुःख'

खडसे यांनी यावेळी आपल्या जावयाचे समर्थन केले नाही, हे स्पष्ट केले. ते म्हणाले, "मी कधीही माझ्या जावयाचे समर्थन केले नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? तरीदेखील रुपाली चाकणकर कोणत्या आधारावर बोलत आहेत?" यासोबतच, "काहीही झाले तरी मी प्रफुल लोढाचा विषय सोडणार नाही. फक्त हनी ट्रॅपवरून लक्ष विचलित करण्यासाठी मला बदनाम केले जात आहे." अशी टीकाही त्यांनी केली.

शेअर करा