मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan News : डोंबिवलीतील 'चैन स्नॅचिंग' टोळी आता कल्याणमध्ये? 'पडघा कुठे आहे' असे विचारून ज्येष्ठाची सोनसाखळी हिसकावली!

•​रेनकॉट घालून आलेल्या दोन चोरट्यांनी 45 हजारांची साखळी लुटली, शहरात भीतीचे वातावरण; पोलिसांनी दिले सतर्क राहण्याचे आवाहन.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News: 15-year-old girl commits suicide after being unable to bear the stress of studies; ends life by jumping from the 31st floor

•​रेनकॉट घालून आलेल्या दोन चोरट्यांनी 45 हजारांची साखळी लुटली, शहरात भीतीचे वातावरण; पोलिसांनी दिले सतर्क राहण्याचे आवाहन.
​
​कल्याण :- गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत महिलांना लुटून हैदोस घालणारी 'चैन स्नॅचिंग' टोळी आता कल्याणच्या दिशेने वळली आहे की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कल्याणमध्ये एका 58 वर्षीय व्यक्तीची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

​ही धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कल्याण पूर्वेतील म्हात्रेनाका परिसरात घडली. सुरेश नामदेव कारवे (58 वय) हे आपली दुचाकी घेऊन जात असताना वाहतूक कोंडीत अडकले. त्याच वेळी, हेल्मेट आणि रेनकोट घालून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले. पाठीमागे बसलेल्या चोरट्याने सुरेश यांना "काका, पडघा कुठे आहे?" असे विचारले. सुरेश यांनी त्यांना रस्ता दाखवल्यानंतर, चोरट्याने अचानक त्यांच्या मानेवर जोरदार थाप मारली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली.

​सुरेश यांनी साखळी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्यांनी ती जबरदस्तीने हिसकावून घेतली. या झटापटीत साखळी तुटली आणि तिचा काही भाग सुरेश यांच्या हातात राहिला, तर उर्वरित 45 हजार रुपयांची साखळी चोरट्यांनी पळवली. अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडला आणि चोरट्यांनी 100 फुटी रस्त्याने सुसाट वेगाने पळ काढला.

​या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, डोंबिवलीतही अशाच प्रकारे दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपयांच्या साखळ्या चोरण्यात आल्या होत्या. त्यामुळे हीच टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याची शक्यता आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने परिधान करून न जाण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: Mumbai Visarjan Sohala 2025 : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या!' च्या गजरात मुंबईकरांचे डोळे पाणावले; भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

शेअर करा