मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan Dombivli Meat Ban : 15 ऑगस्टला कल्याण-डोंबिवलीत मांसविक्री बंदी; राजकीय वाद पेटला

•महापालिकेच्या आदेशामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी; 'लोकांनी काय खावे, हे ठरवणारे पालिका अधिकारी कोण?' असा सवाल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan Dombivli Meat Ban

•महापालिकेच्या आदेशामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी; 'लोकांनी काय खावे, हे ठरवणारे पालिका अधिकारी कोण?' असा सवाल

कल्याण :- स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मांसविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1988 च्या एका जुन्या ठरावाच्या आधारे घेण्यात आलेल्या या आदेशामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, राजकीय वर्तुळातही वादंग निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावरून प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर आक्षेप घेत, "सर्व प्रकारचे वाद पेटवून झाले आहेत, आता राहिलेला शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वाद पेटविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का?" असा संतप्त सवाल केला. "लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणारे महापालिका अधिकारी कोण?" असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर, आदित्य ठाकरे यांनीही प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष न देता महापालिका आयुक्त लोकांना काय खावे हे सांगत असतील, तर त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनीही हा निर्णय अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. एक दिवस शाकाहार पाळण्यास काहीच हरकत नाही, असे सांगत विरोधकांचे काम केवळ टीका करणे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आदेशात नेमके काय?

महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी 19 डिसेंबर 1988 च्या प्रशासकीय ठरावाचा (क्रमांक 750) आधार घेऊन हा आदेश काढला आहे. त्यानुसार, 14 ऑगस्टच्या रात्री 12 पासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, 36 वर्षांपूर्वीच्या या ठरावाचा आता वापर केल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 'गायब'? राजकीय वर्तुळात खळबळ

शेअर करा