मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 'गायब'? राजकीय वर्तुळात खळबळ

•संजय राऊत यांचे अमित शाहांना पत्र; 'धनखडांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल चिंता'

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut

•संजय राऊत यांचे अमित शाहांना पत्र; 'धनखडांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल चिंता'

मुंबई :- देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर ते कुठे आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले असून, शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून धनखड यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल माहितीची मागणी केली आहे.

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी राज्यसभेचे कामकाज अचानक थांबवल्यानंतर राजीनामा दिला. त्यानंतर ते सार्वजनिक जीवनातून अचानक दिसेनासे झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी यापूर्वीही हा मुद्दा उचलून धरत, "विरोधकांना संपवण्याची परंपरा चीन आणि रशियामध्ये आहे," असे म्हणत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

सध्या याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, संजय राऊत यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. 21 जुलै रोजी राज्यसभेचे कामकाज त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर घडलेल्या घटना चिंताजनक आहेत." त्यांनी धनखड यांच्या आरोग्याबाबत तातडीने माहिती देण्याची मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी 'लापता लेडीज' या चित्रपटाची आठवण करून दिली, तर संजय राऊत यांनी विरोधकांना संपवणाऱ्या देशांशी तुलना करत सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये धनखड यांचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्याला सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याने या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.

शेअर करा