मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

कुलकर्णी, यादव, रणदिवे, कांबळे व येरमाळा पत्रकार संघाला उत्कृष्ट पत्रकारसंघ,तर तुळजाई प्रतिष्ठानला समाज सेवा पुरस्कार जाहीर

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

कुलकर्णी, यादव, रणदिवे, कांबळे व
येरमाळा पत्रकार संघाला उत्कृष्ट पत्रकारसंघ,तर
तुळजाई प्रतिष्ठानला समाज सेवा पुरस्कार जाहीर

कळंब/धाराशिव (प्रतिनिधी)
दि.5 जानेवारी दरवर्षी प्रमाणे कळंब तालुका पत्रकार संघाचे मानाचे पुरस्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या अध्यक्षेखाली जाहीर करण्यात आले असून, या वर्षी शहाजी चव्हाण यांच्या तूळजाई प्रतिष्ठान या संस्थेला समाजसेवे साठी, तर पत्रकारिते साठी दिल्ली येथील निलेशकुमार कुलकर्णी, सांगोला येथील राजेंद्र यादव, शिरीष रणदिवे,निळकंठ कांबळे तर आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार ईटकुर जिल्हा परिषद शाळेतील अनिल शिंदे , ,याना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे 27 वे वर्ष आहे. फेब्रुवारी मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.
कळंब तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक पत्रकार भवन येथे अशोक शिंदे यांच्या अध्यक्ष ते खाली घेण्यात आली. या वेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येवून , या वर्षी चे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या मध्ये
शि.म.ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिल्ली येथील निलेशकुमार कुलकर्णी,
स्वा.सैनिक शिवशंकर बप्पा घोंगडे पत्रकारिता पुरस्कार -राजेंद्र यादव सांगोला,
स्व.गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार - निळकंठ कांबळे उमरगा
स्वा. सै.स्व. शकुंतला देशपांडे समाज सेवा पुरस्कार - शहाजी चव्हाण यांची तळजाई प्रतिष्ठान ,
रा. ई. काकडे शोध पत्रकारिता पुरस्कार - शिरीष रणदिवे पुणे,
स्व.सुधाकर सावळे उत्कृष्ट पत्रकार संघ पुरस्कार - येरमाळा पत्रकार संघ येरमाळा स्व.के.ए.जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार ..अनिल शिंदे क्रीडा शिक्षक यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केले.
फेब्रुवारीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.पत्रकार संघाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा