मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे सरकारी वकील नाराजी… सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप

Jitendra Awhad On Sarkar : वाढदिवसानिमित्त सरकारने मला अनोखी भेट दिल्याचा आरोप ; आमदार जितेंद्र आव्हाड

V
Vivek

2 मिनिट वाचन

JItendra-Awhad

Jitendra Awhad On Sarkar : वाढदिवसानिमित्त सरकारने मला अनोखी भेट दिल्याचा आरोप ; आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई :- साडेतीन वर्षांपूर्वी एका खटल्याच्या विरोधात सरकारी वकील दिल्याने जितेंद्र आव्हाड चांगलेच नाराज झाले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी Maha Vikas Aghdi विरुद्ध महायुती Mahyuti यांच्यात शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्या साडेतीन वर्षांपूर्वी एका खटल्यातील सरकारी वकील सरकारची बाजू मांडणार असल्याचे म्हटले आहे. परंतु हे खास वकील खास कारणाकरिता माझ्या विरोधात खटल्यात सरकारची बाजू मांडणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हणाले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हणाले की,मला माहित नव्हते की, हे सरकार मला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देणार आहे. सूडाग्नीने पेटलेले हे सरकार पोलिसांना मोहरा बनवून सुडाचा खेळ खेळत आहे. साडेतीन वर्षांपूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ६ तारखेला विशेष सरकारी वकिलांनी मी या गुन्ह्य़ाच्या खटल्यात सरकार / पोलिसांची बाजू मांडणार आहे, असे सत्र न्यायालयात सांगितले. खास वकिल आणण्याचे 'खास' कारण काही समजलेले नाही. पण, यातून सरकारचा हेतू आणि सरकारची सूडाची भावना ही काही लपून रहात नाही. जेवढे खोटे करायचे तेवढे खोटे या सरकारने आणि ठाणे पोलिसांनी केले अन् अजूनही करीत आहेत आणि सांगताना मात्र , "आम्हाला काही माहितच नाही; आमचा काही संबंधच नाही," असे म्हणत असतात. महत्वाचे म्हणजे, केस लिहिताना आपण काय लिहित आहोत हेच त्यांना माहित नसते, अशी अवस्था ठाणे पोलिसांची झाली आहे. आपली अनभिज्ञता की आपली हतबलता हीच त्यांना कळत नाही.
असो, त्याच्याने फारसा फरक पडत नाही. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. आज सासूचे तर उद्या सुनेचे दिवस येणारच आहेत. वक्त- वक्त की बात है, वक्त सभी पे आता है. चलो, रूकते है; देखते है , कितना दिन चलेगा. सरकारचे अभिनंदन, मला वाढदिवसाला एवढी चांगली भेट दिल्याबद्दल !! माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचे आभार ; मला वाढदिवसानिमित्त एवढी चांगली भेट दिली.
पुरोगामी महाराष्ट्राच्या हितासाठी लढायला ईश्वर मला आणखी शक्ती देवो, एवढीच आई भवानी चरणी प्रार्थना !!
लडनेसेकौनडरताहै!

हेही वाचा: Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांची न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया..

शेअर करा