मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sangli News : राजकारणात निष्ठा महत्त्वाची : जयंत पाटील

सांगली : “मला पद मिळेल न मिळेल त्यात काय आता लगेच.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

राजकारणात निष्ठा महत्त्वाची - पाटील
राजकारणात निष्ठा महत्त्वाची - पाटील

Sangli News : आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही वक्तव्याची जोरदार चर्चा

सांगली : “मला पद मिळेल न मिळेल त्यात काय आता लगेच. पण गत सोडायची नसते, पण आपली माणस आपलीच. आपल्या बरोबर असतात यालाच राजकारणात महत्व द्यायचे असते. आणि निष्ठा महत्वाची आहे, असे विधान जयंत पाटलांनी केले आहे. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये ते बोलत होते. परिस्थिती नुसार बदलत गेले ना तर त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे निष्ठा असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. https://maharashtramirror.com/ Sangli News
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र विमान प्रवास केला होता. त्याअगोदर जयंत पाटील यांनी महायुतीमधील अनेक नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. त्यामुळे मध्यतरीच्या काळात जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद मिळणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. आता सांगली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.https://maharashtramirror.com/ Sangli News
गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे जयंत पाटील मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचाही दावा करण्यात आला. अजूनही केला जात आहे. त्याचवेळी जयंत पाटील यांनी जाहीर सभेत पुन्हा एकदा या विधानातून निष्ठेला महत्व असल्याचे स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक दिलीप तात्या पाटील यांचा वाढदिवसानिमित्त निष्ठा आणि जीवनावर आधारित फिडेल नावच पुस्तकाच अनावरण यावेळी करण्यात आले. https://maharashtramirror.com/ Sangli News
आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही : जयंत पाटील
कृष्णा काठच्या लोकांची आपली परंपरा लढाईची आणि संघर्षाची आहे. संघर्ष करण्याचं या कृष्णा काठच्या लोकांना शिकवले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अनेक नवे आहेत. त्यामुळे या कृष्ण काठच्या माणस आम्ही फार वेगळी आहोत. आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटल्याने त्यांच्या मनात नेमकं चाललयं तरी काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शेअर करा