मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jammu Kashmir Assembly Elections : जम्मू-काश्मीरमध्ये अजित पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची काय अवस्था होती? मतांची ही टक्केवारी मिळाली

Jammu Kashmir Assembly Elections : जम्मू-काश्मीरमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला 0.4 टक्के मते मिळाली आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jammu Kashmir Assembly Elections : जम्मू-काश्मीरमध्ये अजित पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची काय अवस्था होती? मतांची ही टक्केवारी मिळाली

Jammu Kashmir Assembly Elections : जम्मू-काश्मीरमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला 0.4 टक्के मते मिळाली आहेत. तर उद्धव ठाकरे गटाला 0.5 टक्के मते मिळाली आहेत. दोघांनीही युती सोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.

ANI :- 2024 च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे Jammu Kashmir Assembly Elections निकाल काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युतीच्या बाजूने आले आहेत. येथे भाजप 29 जागांवर आघाडीवर असून फारुख अब्दुल्ला 41 जागांवर आघाडीवर आहेत. त्याचबरोबर काँग्रेसलाही 6 जागा मिळत आहेत. याशिवाय मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाला 4 तर अपक्षांना 7 जागा मिळताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. निवडणूक निकालांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 0.04 टक्के, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0.05 टक्के मते मिळाली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होत असून पक्ष 20 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

हेही वाचा: Telegram Fraud News : टेलिग्रामच्या चॅनलवर‌ गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक , फसवणुकीतील रक्कम ऐकून तुम्ही होणार हैराण!

हेही वाचा: Ambernath Crime News : तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी तरीही बेकायदेशीर वाहतूक, 22 वर्षीय तरुणाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

शेअर करा