मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jammu and Kashmir News: काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक, लष्कराचे 4 जवान जखमी, परिसरात शोध मोहीम सुरू

Jammu and Kashmir News : काश्मीरमधील कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल
कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल

Jammu and Kashmir News: काश्मीरमधील कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस जखमी झाला आहे.

ANI :- काश्मीरमधील Jammu and Kashmir कुलगाममधील Kulgam आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर माहिती देताना भारतीय लष्कराने सांगितले की,विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, आज भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर यांनी कुलगामच्या अरिगाममध्ये संयुक्त ऑपरेशन सुरू केले. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि गोळीबार झाला. ऑपरेशन चालू आहे"कुलगाममधील आदिगम देवसर भागात चकमक सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि सुरक्षा दल हजर आहे. पुढील माहिती लवकरच शेअर केली जाईल.” दरम्यान, दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले आहे.

या कारवाईत लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचाही सहभाग आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सतत अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी खोऱ्यात सतत शोधमोहीम राबवली जात आहे.

शुक्रवारी पोलिसांनी अवंतीपोरा, पुलवामा येथे दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे. ते तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत असत.पोलिसांनी त्यांच्याकडून 5 आयईडी, 30 डिटोनेटर, आयईडीच्या 17 बॅटरी, 2 पिस्तूल, 3 मॅगझिन, 25 राउंड, 4 हातबॉम्ब आणि 20 हजार रुपये रोख जप्त केले आहेत. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: Mira Road Fraud News : अँटी आयरन मेकिंग कॉईन नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

शेअर करा