मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalna ACB Trap : फेर नोंदसाठी लाच घेणारा तलाठी 'एसीबी'च्या जाळ्यात

Anti Corruption Bureau Arrested Talathi For Taking Bribe : तलाठी सज्जा जालना येथे 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jalna ACB Trap : फेर नोंदसाठी लाच घेणारा तलाठी 'एसीबी'च्या जाळ्यात

Anti Corruption Bureau Arrested Talathi For Taking Bribe : तलाठी सज्जा जालना येथे 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

जालना :- शेती जमीन विकत घेतल्यानंतर सातबारा उताऱ्यावर फेर घेण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी 25 हजारांची लाच मागणाऱ्या जालना येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. Anti Corruption Bureau आज (6 नोव्हेंबर) ही कारवाई झाली. दुर्वेश गणेश गिरी Durvesh Giri Talathi Bribe News (44 वय ) असे तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी जालना शहरातील शेती जमीन सर्वे नंबर 284 मधील प्लॉट नंबर 40 हा खरेदी केला असून सदर प्लॉटचा फेर घेण्यासाठी तलाठी गिरी यांनी तक्रारदार यांना दिनांक 5 नोव्हेंबर रोजी लाच मागणी पडताळणी मध्ये 25 हजार रुपये लाचेचे मागणी करून लाचेची रक्कम गिरी, तलाठी सजा जालना यांनी आज 6 नोव्हेंबर रोजी पंचा समक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे . तलाठी यांच्या वरती पोलीस ठाणे कादिम जालना येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

acb sp sandeep aatole

एसीबी पथक

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर. मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, बाळु जाधवर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.जालना, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- शंकर म .मुटेकर पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि जालना सापळा पथक - पोलीस हवालदार गजानन खरात,भालचंद्र बिनोरकर, अतिश तिडके, गजानन कांबळे.

तलाठी यांचे सक्षम अधिकारी- जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तलाठ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकीच्या हत्येतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमकीचा फोन, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा पोलिसांना संशय

हेही वाचा: Nalasopara Crime News : उत्तरप्रदेशमध्ये राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांना नालासोपारामधुन अटक, वसई-विरार वाहनचोरी

शेअर करा