मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IPL 2025 : मुंबई इंडियन्सची शानदार खेळी; 59 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश

Mi Vs DC Highlights : सूर्यकुमार यादवची नाबाद 73 धावांची दमदार खेळी,बुमराह-सॅनटनरची धारदार गोलंदाजी

V
Vivek

1 मिनिट वाचन

IPL 2025 : मुंबई इंडियन्सची शानदार खेळी; 59 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश

Mi Vs DC Highlights : सूर्यकुमार यादवची नाबाद 73 धावांची दमदार खेळी,बुमराह-सॅनटनरची धारदार गोलंदाजी

मुंबई :- आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. Mumbai Qualify For Playoff बुधवारी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 59 धावांनी पराभूत करत आपली ताकद दाखवून दिली. या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपला. Mi Vs DC Highlights

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 बाद 180 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत नाबाद 73 धावा करत शानदार फटकेबाजी केली. त्याला रेयान रिकेल्टन (25), विल जॅक्स (21), तिलक वर्मा (27) आणि नमन धीर (नाबाद 24) यांची उत्तम साथ मिळाली. शेवटच्या दोन षटकांत सूर्यकुमार व नमनने मिळून 48 धावा कुटल्या.

प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा डाव 18.2 षटकांत 121 धावांत संपुष्टात आला. समीर रिजवीने सर्वाधिक 39 धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि मिचेल सॅनटनर यांनी प्रभावी गोलंदाजी करत दिल्लीला कोलमडवले.

सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने सांगितले, "माझ्या पत्नीने आज मला एक खास गोष्ट सांगितली – तू मॅन ऑफ द मॅच सोडून सगळे पुरस्कार घेतले आहेत. त्यामुळे हा पुरस्कार तिच्यासाठी. संघासाठी ही खेळी खूप महत्त्वाची होती आणि आम्ही हा क्षण साजरा करणार आहोत."

शेअर करा