मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ind Vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वी जैस्वालची पुन्हा शतकी धडाकेबाज खेळी

India Vs West Indies 2 nd Test Update : दिल्ली कसोटीत शुभमन गिलचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; जैस्वालचे कारकिर्दीतील 7 वे शतक 145 चेंडूत शतक पूर्ण; या वर्षातील तिसरे कसोटी शतक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ind Vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वी जैस्वालची पुन्हा शतकी धडाकेबाज खेळी

India Vs West Indies 2 nd Test Update : दिल्ली कसोटीत शुभमन गिलचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; जैस्वालचे कारकिर्दीतील 7 वे शतक 145 चेंडूत शतक पूर्ण; या वर्षातील तिसरे कसोटी शतक

Ind vs West Indies 2nd test match :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने शानदार शतक झळकावले आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

जैस्वालने आपल्या आक्रमक शैलीचा करिष्मा दाखवत, दुसऱ्या सत्रात केवळ 145 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने शतकापर्यंत पोहोचण्यासाठी 16 चौकार मारले, पण एकही षटकार मारला नाही.

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरे शतक

यशस्वी जैस्वालचे वेस्ट इंडिजविरुद्धचे हे दुसरे कसोटी शतक आहे. विशेष म्हणजे, भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याने कसोटी पदार्पण करतानाही शतक झळकावले होते. पहिल्या कसोटी सामन्यात मोठी खेळी खेळता न आलेल्या जैस्वालने दुसऱ्या सामन्यात मात्र आपला ठसा उमटवला.

या वर्षातील तिसरे शतक

जैस्वालचे हे या वर्षातील तिसरे कसोटी शतक आहे.

जून-जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्याने दोन शतके झळकावली होती.

यापूर्वी, फेब्रुवारी 2024 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध भारतात एसीए-व्हीडीसीए स्टेडियम (209 धावा) आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (214 धावा) येथे सलग द्विशतके झळकावली होती.

सतत चांगला फॉर्म दाखवणारा जैस्वाल भारतीय संघासाठी महत्त्वाचा फलंदाज ठरत आहे.

शेअर करा