मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IND vs NZ 2nd Test Day 3 Live Score: भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी 359 धावांचे लक्ष

IND vs NZ 2nd Test Day 3 Live Score: कॅप्टन रोहित शर्मा 34 धावावर बाद, लंच टाईमापर्यंत भारताचे धावसंख्या 81 झाली आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

IND vs NZ 2nd Test Day 3 Live Score: भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी 359 धावांचे लक्ष

IND vs NZ 2nd Test Day 3 Live Score: कॅप्टन रोहित शर्मा 34 धावावर बाद, लंच टाईमापर्यंत भारताचे धावसंख्या 81 झाली आहे

BCCI :- भारत आणि न्यूझीलंड IND VS NZ यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळला जात आहे. याआधी या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूमध्ये खेळवण्यात आला होता. बंगळुरू कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता टीम इंडिया पुणे कसोटीतही पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे.

359 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी लंच पर्यंत एक गडी गमावून 81 धावा केल्या आहेत. भारताला आता विजयासाठी आणखी 278 धावा करायच्या आहेत. रोहित शर्माची बॅट चालली नसली तरी यशस्वी जैस्वालच्या धावांच्या वेगात काही फरक पडला नाही.शुभमन गिलही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. यशस्वी जैस्वाल 36 चेंडूत 46 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. शुभमन गिल 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 22 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 38 चेंडूत 47 धावांची भागीदारी आहे.

भारताने 34 धावांवर पहिली विकेट गमावली. कर्णधार रोहित शर्मा 16 चेंडूत आठ धावा करून बाद झाला. मिचेल सँटनरने हिटमनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

शेअर करा