मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

भीषण सायबर फ्रॉड : 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली नाशिकमध्ये 6 कोटींसह 72 लाखांना गंडा

•भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर करण्याची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला लुटले ; आधार कार्ड, सिम कार्डच्या गैरवापराने भीती दाखवली; सायबर साक्षरतेची तातडीची गरज

V
Vivek

2 मिनिट वाचन

Navi Mumbai Crime: Cyber ​​fraud exposed in 17 days! Navi Mumbai Police's big achievement

•भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर करण्याची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला लुटले ; आधार कार्ड, सिम कार्डच्या गैरवापराने भीती दाखवली; सायबर साक्षरतेची तातडीची गरज

नाशिक :- नाशिकमध्ये 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) या सायबर फसवणुकीच्या अत्यंत धोकादायक पद्धतीने दोन मोठ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात एका ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपये तर दुसऱ्या वृद्ध व्यक्तीला तब्बल 6 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी पीडितांना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयात हजर करण्याची धमकी देत मानसिकरित्या हतबल केले.

सरन्यायाधीशांच्या नावाने धमकी

गंगापूर रोडवरील लालसरे दाम्पत्याच्या बाबतीत ही घटना घडली. 74 वर्षीय अनिल लालसरे यांना सायबर फ्रॉडचा फटका बसला. आरोपींनी त्यांना फोन करून, "तुमच्या आधार कार्डवरून क्रेडिट कार्ड इश्यू करण्यात आले असून त्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. तुम्हाला 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आले आहे आणि आता सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर केले जाईल." अशी भीती दाखवली.

या गैरव्यवहारासाठी 72 लाख रुपयांचा दंड झाल्याचे सांगत, ती रक्कम न भरल्यास सीबीआयचे पथक अटक करून दिल्लीला घेऊन जाईल, अशी धमकी देण्यात आली.

आयुष्यभराची पुंजी गमावली

वृद्धापकाळ आणि पत्नीच्या अर्धांगवायूच्या आजारामुळे भावनिकदृष्ट्या खचलेल्या अनिल लालसरे यांनी, व्यवस्थित चालता येत नसतानाही बँकेत जाऊन आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर RTGS द्वारे पैसे भरून दिले आणि आयुष्यभराची पुंजी गमावली. नातेवाईक भेटायला आल्यावर ही धक्कादायक घटना उघड झाली.

6 कोटींचा दुसरा फ्रॉड

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असतानाच, आणखी एका वृद्ध व्यक्तीला अशाच पद्धतीने तब्बल 6 कोटी रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे. तुमच्या सिम कार्डवरून अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असल्याने सरन्यायाधीशांच्या कोर्टात हजर करण्यात आल्याचे सांगत त्यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यात आली होती.

सायबर साक्षरतेची गरज

तंत्रज्ञान अवगत नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या रॅकेटवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी तज्ज्ञ करत आहेत. "ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात किती रक्कम आहे, याची माहिती सायबर गुन्हेगारांना कशी मिळते, याचा छडा लावल्याशिवाय हे रॅकेट उद्ध्वस्त होणार नाही," असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: Thane News : 'टाऊनशिप'च्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवले; हिरानंदानी इस्टेटच्या विकासकावर कारवाईची मागणी

शेअर करा