Pune News : हिंजवडीत मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा आक्रोश
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: हिंजवडी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे, सततची वाहतूक कोंडी, वीज आणि मूलभूत सुविधांचा उडालेल्या बोजवाराविरोधात आयटी कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी रविवारी (दि.) हिंजवडीत मूक मोर्चा काढला.
2 मिनिट वाचन

Pune News : आयटी कर्मचाऱ्यांसह परिसरातील हजारो लोक रस्त्यावर; आमदार आदित्य ठाकरे यांचा आंदोलकांना पाठिंबा
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: हिंजवडी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे, सततची वाहतूक कोंडी, वीज आणि मूलभूत सुविधांचा उडालेल्या बोजवाराविरोधात आयटी कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी रविवारी (दि.) हिंजवडीत मूक मोर्चा काढला. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही सहभागी होत आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.https://maharashtramirror.com/ Pune News
फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजच्या नेतृत्वाखाली आयोजित मोर्चाची सुरुवात हिंजवडीच्या पहिल्या टप्प्यातील इन्फोसिस सर्कलपासून झाली. शिवाजी चौकापर्यंत जाऊन मोर्चा पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परतला. हिंजवडीसह माण, मारुंजी आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकही यामध्ये सहभागी झाले.https://maharashtramirror.com/ Pune News
देशातील प्रमुख माहिती-तंत्रज्ञान केंद्रांपैकी एक असलेल्या हिंजवडीत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे असून, पादचाऱ्यांसाठी पुरेसे पदपथही नाहीत. वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि जलनिस्सारणाच्या प्रश्नांकडे वारंवार लक्ष वेधूनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही, अशी आंदोलकांची तक्रार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांत काही नागरिकांचा जीव गेला असून, मृतांच्या कुटुंबीयांनीही आंदोलनात सहभाग घेतल्याचे पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी सांगितले. आणखी दुर्घटना होण्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मोठ्या प्रमाणावर कर भरूनही दर्जेदार रस्ते आणि पदपथांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना आयटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. मागील चार वर्षांत परिस्थितीत विशेष बदल झालेला नाही, असेही काही रहिवाशांनी सांगितले.
हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती दल स्थापन केले आहे. रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोच्या समस्यांवर हे दल विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणार आहे. हिंजवडीतील रस्ते आणि इतर सुविधांसाठी ४२६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सर्व कामे दीड वर्षात, तर महत्त्वाची कामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळालाही आपल्या हद्दीतील कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हिंजवडीचा काही भाग ग्रामपंचायतींच्या, तर आयटी पार्कचा काही भाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतो. याशिवाय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा अनेक यंत्रणा या भागातील विविध कामांसाठी जबाबदार आहेत. त्यांच्यातील समन्वयाचा अभाव हा प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील प्रमुख अडथळा असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. दरम्यान या आंदोलनात सुमारे पाच हजार नागरिक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
मूलभूत सुविधांसाठी आंदोलन हे दुर्दैव : आमदार आदित्य ठाकरे
आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंजवडीतील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आंदोलन करावे लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हिंजवडी आयटी पार्क रोजगार आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. तरीही येथे रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोच्या समस्या आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला होत असलेल्या विलंबावरही त्यांनी टीका केली. या सर्व प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.




