मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Harshvardhan Sapkal : मुंब्राची जीवघेणी गर्दी! हे अपघात नाही, सरकारी बेजबाबदारीचे बळी – सपकाळ यांचा संतप्त आरोप

Harshvardhan Sapkal On Mumbra Railway Accident : रेल्वेमंत्रींची हकालपट्टी करा; मुंबईकरांच्या जीवाशी सरकार खेळतेय – काँग्रेसचा हल्लाबोल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Harshvardhan Sapkal : मुंब्राची जीवघेणी गर्दी! हे अपघात नाही, सरकारी बेजबाबदारीचे बळी – सपकाळ यांचा संतप्त आरोप

Harshvardhan Sapkal On Mumbra Railway Accident : रेल्वेमंत्रींची हकालपट्टी करा; मुंबईकरांच्या जीवाशी सरकार खेळतेय – काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई | मुंबईच्या लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल प्रवासात पुन्हा एकदा भीषण घटना घडली. ठाण्याजवळील मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.Harshvardhan Sapkal On Mumbra Railway Accident ही घटना केवळ अपघात नसून सरकारी निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

सपकाळ म्हणाले, "मुंबईकर रोज जीव मुठीत धरून लोकलने प्रवास करतात. पण सरकार आणि रेल्वे प्रशासन त्यांच्या जिवाच्या सुरक्षिततेबाबत पूर्णपणे उदासीन आहे. अपघात होत नाहीत, बळी घेतले जातात – आणि हे बळी सरकारच्या बेजबाबदार धोरणांचे परिणाम आहेत."

ते पुढे म्हणाले, "भ्रष्टाचार, टेंडरबाजी, इव्हेंटबाजी आणि बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारने लोकलच्या वास्तवाकडे लक्ष द्यावे. अकरा वर्षांपासून केवळ गाजर दाखवले जात आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी."

मुंबईतील दररोजचे 75 लाख प्रवासी ही संख्या काही छोटी नाही, पण त्या तुलनेत सुविधांची पातळी अत्यंत दयनीय आहे. यावर सातत्याने चर्चा, घोषणा आणि दिखावा चालतो – मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अपघातानंतर काही दिवस घोषणांची गर्दी होते आणि काही आठवड्यांत ती विस्मरणात जाते. यापुढे असे चालणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

शेअर करा