मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : महापालिकेच्या कार्यालयातच मिळेना पाणी!;प्रशासनावरच आलीय बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : संपूर्ण परिसराच्या मूलभूत सुविधांची काळजी वाहण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका कार्यालयात गेले १५ दिवस पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

महापालिकेच्या कार्यालयातच मिळेना पाणी! प्रशासनावरच आलीय बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ हडपसर मनपा कार्यालयातच १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी गायब
महापालिकेच्या कार्यालयातच मिळेना पाणी! प्रशासनावरच आलीय बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ हडपसर मनपा कार्यालयातच १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी गायब

Pune News :हडपसर मनपा कार्यालयातच १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी गायब

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : संपूर्ण परिसराच्या मूलभूत सुविधांची काळजी वाहण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका कार्यालयात गेले १५ दिवस पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका बाजूला हडपसर आणि मांजरी भागातील नागरिक अशुद्ध अन् अनियमित पाणीपुरवठ्याने हैराण झाले असताना, दुसरीकडे स्वतः प्रशासकीय कार्यालयावरच पाणी विकत घेण्याची वेळ आल्याने पालिकेच्या ढिसाळ नियोजनावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

हडपसर-मांजरी परिसरात पाणी प्रश्न बनला गंभीर

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या ससाणेनगर, हडपसर गाव, काळे-बोराटे नगर, सातवडी, गोंधळेनगर आणि लगतच्या विविध उपनगरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीप्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. नळांना नियमित आणि वेळेवर पाणी न येणे, पाणी आल्यास अत्यंत कमी दाबाने येणे आणि अनेकदा गढूळ किंवा दूषित पाण्याचा पुरवठा होणे, अशा तक्रारींचा पाढा नागरिकांनी वाचला आहे. पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी नागरिकांना नाहक कसरत करावी लागत असून, पालिकेकडून यावर कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.

कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांची मोठी फरपट

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांची रोज मोठी वर्दळ असते. या इमारतीत कर विभाग, अतिक्रमण, जन्म-मृत्यू नोंदणी, वृक्ष छाटणी व उद्यान, पथ विभाग, चेंबर व ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, कीटकनाशक आणि मालमत्ता विभाग असे अनेक महत्त्वपूर्ण विभाग कार्यरत आहेत. त्यातच याच आवारात आधार केंद्र असल्याने विविध दाखले, नोंदणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी दररोज शेकडो नागरिक येथे येतात.
यामध्ये महिला, लहान मुले, नवजात बालकांना सोबत घेऊन येणाऱ्या माता, वयोवृद्ध नागरिक आणि कामगार वर्गाचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून या कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचे रांजण सुके ठाक पडले आहेत. या कडक उन्हात किंवा त्रासात कामानिमित्त तासन तास ताटकळत उभ्या राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नागरिक आणि कर्मचाऱ्यांना तहान भागवण्यासाठी रोज स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे.

“माझा संबंध फक्त तिसऱ्या मजल्याशी!”: अधिकाऱ्याने केले हात वर

प्रशासनाची ही उदासीनता एवढ्यावरच थांबलेली नाही, तर अधिकाऱ्यांच्या जबाबदारी झटकण्याच्या वृत्तीमुळे नागरिकांचा रोष अधिकच अनावर झाला आहे. या प्रशासकीय गोंधळाबाबत प्रशासकीय अधिकारी महेश खंदारे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता, त्यांनी दिलेले उत्तर थक्क करणारे होते.
“माझ्याकडे केवळ क्षेत्रीय कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी आहे. तळमजला, पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावरील समस्या किंवा सोयी-सुविधांशी माझा थेट संबंध नाही,” असे सांगत खंदारे यांनी आपली जबाबदारी झटकली.

अधिकाऱ्याच्या या बेजबाबदार वक्तव्यानंतर ‘महापालिकेत नक्की चाललंय काय?’ असा सवाल नागरिक विचारत आहेत. जर एकाच इमारतीमधील पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या समस्यांची जबाबदारी स्वीकारायला अधिकारी तयार नसतील, तर संपूर्ण हडपसर-मांजरी परिसरातील लाखो नागरिकांच्या पाणीसमस्येचे निवारण कोण करणार, असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची त्रस्त नागरिकांची मागणी
ज्या महापालिका प्रशासनावर नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी पुरवण्याची घटनात्मक जबाबदारी आहे, तेच प्रशासन स्वतःच्या कार्यालयात साधे पिण्याचे पाणी ठेवू शकत नसेल, तर यापेक्षा मोठा दैवदुर्विलाक कोणता असणार? नागरिक कर भरूनही त्यांना मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
हडपसर-मांजरी परिसरातील अशुद्ध आणि अनियमित पाणीपुरवठा तातडीने सुलभ करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. तसेच, क्षेत्रीय कार्यालयातील पिण्याच्या पाण्याची बंद पडलेली व्यवस्था २४ तासांच्या आत पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. आता तरी पालिका प्रशासन झोपेतून जागे होऊन यावर ठोस कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा