Washington News : अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती
Washington News : वॉशिंग्टन : ‘एच१-बी’ व्हिसासाठी प्रस्तावित अतिरिक्त एक लाख तीन हजार २६५ डॉलर शुल्कामुळे अमेरिकेतील नोकऱ्या परदेशात जाण्याची शक्यता असल्याची चिंता भारतीय-अमेरिकी वकिली करणाऱ्या ‘फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज’ने (एफआयआयडीएस) व्यक्त केली आहे.
1 मिनिट वाचन

Washington News : वॉशिंग्टन: ‘एच१-बी’ व्हिसासाठी प्रस्तावित अतिरिक्त एक लाख तीन हजार २६५ डॉलर शुल्कामुळे अमेरिकेतील नोकऱ्या परदेशात जाण्याची शक्यता असल्याची चिंता भारतीय-अमेरिकी वकिली करणाऱ्या ‘फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज’ने (एफआयआयडीएस) व्यक्त केली आहे. असामान्यरीत्या मोठे शुल्क आकारल्यास कायदेशीर पद्धतीने होणारी भरती कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरू शकते. त्यामुळे कंपन्या उच्च-मूल्याच्या नोकऱ्या परदेशात हलवण्यास प्रवृत्त होऊ शकतात, असे ‘एफआयआयडीएस’ने म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Washington News
अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने ‘एच१-बी’ व्हिसासाठी पात्र असलेल्या अर्जांवर अतिरिक्त १ लाख ३ हजार २६५ डॉलर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मंगळवारी मांडला. यात उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठीच्या सवलतीअंतर्गत येणाऱ्या अर्जांचाही समावेश आहे. “राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी, गैरप्रकार रोखण्यासाठी आणि कायदेशीर स्थलांतराचे व्यवस्थापन करण्यासाठी गृहसुरक्षा विभाग आणि ‘यूएससीआयएस’ला पुरेशी संसाधने आवश्यक आहेत, हे आम्ही मान्य करतो. https://maharashtramirror.com/ Washington News
मात्र, १ लाख ३ हजार २६५ डॉलरचे ‘एच१-बी’ शुल्क आर्थिक अडचणीत असलेल्या स्टार्टअपसाठी मोठा अडथळा ठरू शकते. तसेच हजारो ‘एच१-बी’ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणाऱ्या कंपन्यांवर कोट्यवधी डॉलरचा अतिरिक्त खर्च येऊ शकतो,” असे ‘एफआयआयडीएस’चे धोरण व रणनीती प्रमुख खंडेराव कांड यांनी म्हटले आहे. संभाव्य एक लाख डॉलरच्या ‘ओपीटी’ शुल्कासोबत हे शुल्क लागू झाल्यास एकूण खर्च २ लाख ३ हजार २६५ डॉलर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून रोजगाराकडे जाण्याचा मार्गच परवडणारा राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.




