मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Golden Humanity Award 2025 : ‘गोल्डन ह्यूमनिटी अवॉर्ड २०२५’ यशस्वीरित्या संपन्न; समाजसेवकांचा सन्मान

पनवेल जितिन शेट्टी : होपमिरर फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘गोल्डन ह्यूमनिटी अवॉर्ड २०२५’ हा भव्य पुरस्कार सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jitendra Awhad

पनवेल जितिन शेट्टी : होपमिरर फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘गोल्डन ह्यूमनिटी अवॉर्ड २०२५’ हा भव्य पुरस्कार सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या समारंभात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी शिवसेना नेते संजोग वाघेरे पाटील, शेकाप नेते बाळाराम पाटील, राष्ट्रवादी नेते सुहास देसाई, सतीश पाटील, सुरेश बने, रविंद्र चव्हाण, गोपाल पाटील, प्रमोद (आप्पा) पाटील आणि अब्दुल माजीद यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

छायाचित्रे · 1/5

Arrow Keys ⟵ ⟶

होपमिरर फाउंडेशनचे संस्थापक रमझान शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “गोल्डन ह्यूमनिटी अवॉर्ड हा केवळ एक पुरस्कार सोहळा नसून, समाजात माणुसकी जपणाऱ्या खऱ्या हिरोंना पुढे आणण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळाली आहे.”

हा सोहळा सामाजिक एकता, प्रेरणा आणि माणुसकीच्या मूल्यांचा संदेश घेऊन यशस्वीपणे संपन्न झाला. होपमिरर फाउंडेशनच्या पुढील उपक्रमांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News : एक वर्षांनंतर 'दारुड्या' मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

शेअर करा