मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Eng vs Ind 1st Test Day-1 Live : शुबमनच्या नेतृत्त्वात नव्या युगाची सुरुवात! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला भव्य प्रारंभ

India Vs England : साई सुदर्शन व करूण नायरचे कसोटीत दमदार पदार्पण, गिलच्या नेतृत्वातील भारताची पहिली कसोटी मोहीम

V
Vivek

1 मिनिट वाचन

Eng vs Ind 1st Test Day-1 Live : शुबमनच्या नेतृत्त्वात नव्या युगाची सुरुवात! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला भव्य प्रारंभ

India Vs England : साई सुदर्शन व करूण नायरचे कसोटीत दमदार पदार्पण, गिलच्या नेतृत्वातील भारताची पहिली कसोटी मोहीम

BCCI :- भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वात भारताने इंग्लंडविरुद्धच्या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. Eng vs Ind 1st Test Day-1 Live लीड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

या मालिकेने भारतीय संघाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. भारताकडून साई सुदर्शन आणि अनुभवी पण पुनरागमन केलेला करूण नायर यांचे कसोटी पदार्पण आज झाले. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. भारतीय संघाने तीन वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शार्दुल ठाकूर आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा हे महत्वाचे खेळाडू आहेत.

विशेष म्हणजे, ही ऐतिहासिक मालिका आता "अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी" या नावाने ओळखली जाणार आहे. मालिकेच्या पूर्वसंध्येला या ट्रॉफीचं अनावरण सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या उपस्थितीत पार पडलं. ही ट्रॉफी केवळ दोन महान खेळाडूंना सन्मान देत नाही, तर कसोटी क्रिकेटच्या गौरवशाली परंपरेचाही साक्षीदार ठरते.

या मालिकेतील विजेता संघ पतौडी मेडलचा मानकरी ठरेल. आता सर्वांचे लक्ष शुबमन गिलच्या नव्या नेतृत्वात टीम इंडियाच्या कामगिरीकडे लागले आहे. पहिल्या कसोटीतल्या प्रत्येक चेंडूवर इतिहास लिहिला जातोय, आणि प्रत्येक खेळाडू नव्या युगाचा भाग ठरत आहे!

भारताची पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन

झॅक क्राऊली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

शेअर करा