मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या वापरावरून सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना गणेशोत्सव पूर्णपणे सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

Pune News : सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Pune News : ‘पुणेकरच महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करू शकतात’; मुख्यमंत्र्यांची भूमिका

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या वापरावरून सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना गणेशोत्सव पूर्णपणे सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. डीजे वाजवायचा की नाही, या वादात न पडता पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला साजेशा पद्धतीने उत्सव साजरा करून महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुण्यात झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी गणेशोत्सव आणि डीजेच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.https://maharashtramirror.com/ Pune News

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवातील डीजे आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. विद्यानंद बापट यांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात भूमिका घेत हा विषय ऐरणीवर आणला आहे. डीजेच्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी थेट पुणेकरांना सांस्कृतिक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केल्याने या चर्चेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पुण्यात गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही? मी पुणेकरांना सांगू इच्छितो की, संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची क्षमता पुण्यातच आहे. हे फक्त पुणेकरच करू शकतात. त्यामुळे या वादात न पडता संपूर्ण महाराष्ट्राला सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, हे पुणेकरांनी दाखवून दिले पाहिजे.” भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत पुण्याच्या गणेशोत्सव परंपरेचा विशेष उल्लेख केला.https://maharashtramirror.com/ Pune News

डीजेविरोधात पुण्यात आवाज

दरम्यान, पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या वापराला विरोध करणाऱ्या नागरिकांकडून जनजागृती केली जात आहे. कोणत्याही धर्माचा किंवा समाजाचा सण असला तरी कर्णकर्कश डीजेच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, अशी भूमिका या मोहिमेतून मांडण्यात येत आहे. ध्वनीप्रदूषणासंदर्भात अस्तित्वात असलेल्या नियमांची प्रशासन आणि पोलिसांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. पारंपरिक ढोल-ताशा पथके, लेझीम, भजन, कीर्तन, देखावे आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम हे पुण्यातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत विसर्जन मिरवणुका आणि अन्य कार्यक्रमांमध्ये मोठ्या क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणा तसेच डीजेच्या वाढत्या वापरावरून वाद निर्माण होत आहेत. आवाजाच्या तीव्रतेमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत नागरिकांकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

सांस्कृतिक परंपरेला प्राधान्य देण्याचे आवाहन

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे आता गणेश मंडळे आणि उत्सव आयोजक कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. डीजेचा वापर हा उत्सवाचा आवश्यक भाग नसून पुण्याची पारंपरिक सांस्कृतिक ओळख अधिक प्रभावीपणे जपली जाऊ शकते, असा सूर डीजेविरोधी मोहिमेतून उमटत आहे. दुसरीकडे गणेशोत्सवातील ध्वनीव्यवस्थेबाबत प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि नियमांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेत पुण्याला असलेले विशेष स्थान लक्षात घेता, पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करून राज्याला दिशा द्यावी, हा फडणवीस यांच्या आवाहनाचा मुख्य सूर आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना अधिक प्राधान्य मिळणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा