मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

माजी आमदार मुरकुटेंचा धनुष्यबाणाकडे पुनर्विचार; 725 समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश

Former MLA Bhanudas Murkute joins Shiv Sena : श्रीरामपूरमध्ये राजकीय भूकंप; माजी आमदार भानुदास मुरकुटे, नातू नीरज आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांचा शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश

V
Vivek

1 मिनिट वाचन

माजी आमदार मुरकुटेंचा धनुष्यबाणाकडे पुनर्विचार; 725 समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश

Former MLA Bhanudas Murkute joins Shiv Sena : श्रीरामपूरमध्ये राजकीय भूकंप; माजी आमदार भानुदास मुरकुटे, नातू नीरज आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांचा शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश

अहिल्यानगर :- श्रीरामपूर येथील राजकारणाला नव्या वळणावर आणणारी घटना शनिवारी ठाणे येथे घडली. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, त्यांचे नातू व अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे, तसेच माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी अनुक्रमे 650 व 75 समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. Former MLA Bhanudas Murkute joins Shiv Sena

ठाणे येथील आनंद आश्रम येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र देवकर यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते.या प्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली चळवळ आहे. आज मुरकुटे समर्थकांचा प्रवेश हा पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा असलेल्या नेतृत्वाची भर आहे, आणि यामुळे श्रीरामपूर तालुक्यात पक्ष अधिक बळकट होईल."

छायाचित्रे · 1/5

Arrow Keys ⟵ ⟶

माजी आमदार मुरकुटे यांनीही आपले मत व्यक्त करताना सांगितले, "मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारा आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ग्रामीण भागाचा विकास, तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही शिंदे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत."या प्रवेशामुळे श्रीरामपूर तालुक्यातील राजकारणात निश्चितच मोठी घडामोड घडली असून आगामी स्थानिक राजकारणावर याचा ठसा उमटण्याची शक्यता आहे.

शेअर करा