मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Firing outside Punjabi singer : पंजाबी गायक एपी धिल्लनच्या घराबाहेर गोळीबार, सलमान खानसोबतच्या म्युझिक व्हिडिओमुळे संतप्त लॉरेन्स बिश्नोई टोळी!

Firing outside Punjabi singer News : कॅनडामध्ये गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की ते प्रसिद्ध लोकांच्या घराबाहेर गोळीबार करत आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Firing outside Punjabi singer : पंजाबी गायक एपी धिल्लनच्या घराबाहेर गोळीबार, सलमान खानसोबतच्या म्युझिक व्हिडिओमुळे संतप्त लॉरेन्स बिश्नोई टोळी!

Firing outside Punjabi singer News : कॅनडामध्ये गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की ते प्रसिद्ध लोकांच्या घराबाहेर गोळीबार करत आहेत. याआधीही गिप्पी ग्रेवालच्या घरावर हल्ला झाला आहे.

ANI :- कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये पंजाबी गायक अमृतपाल सिंग उर्फ एपी धिल्लन A P Dhillon यांच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे. ही घटना काल घडली असून लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या रोहित गोदारा नावाच्या व्यक्तीने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमृतपाल सिंग ढिल्लन, ज्याला एपी ढिल्लॉन म्हणून ओळखले जाते, हे लोकप्रिय इंडो-कॅनेडियन रॅपर आहेत. एपी ढिल्लनने सलमान खानसोबतचा "ओल्ड मनी" हा म्युझिक व्हिडिओ रिलीज केल्यानंतर काही आठवड्यांनंतर हा हल्ला झाला. त्याची पंजाबी गाणी इंटरनेटवर अनेकदा खळबळ माजवतात.

कॅनेडियन एजन्सी या पोस्टची सत्यता आणि शूटिंगशी संबंधित तथ्ये तपासत आहेत. मात्र, याबाबत पोलिसांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. यापूर्वी पंजाबी सिनेस्टार गिप्पी ग्रेवाल आणि पंजाबी गायक करण औजला यांच्या घरावरही गोळीबार झाला होता. गँगस्टर गोल्डी ब्रार याच्यावर दोन्ही घटनांचा आरोप आहे. या दोन्ही घटना कॅनडामध्ये घडल्या आहेत.

शेअर करा