मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पिंपरीत तरुणावर प्राणघातक हल्ला

फिर्यादी पायी कामावर जात असताना संशयितांनी अडवले

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

पिंपरीत तरुणावर प्राणघातक हल्ला

फिर्यादी पायी कामावर जात असताना संशयितांनी अडवले

पिंपरी: पिंपरीतील गांधीनगर परिसरात पायी कामावर जाणाऱ्या तरुणाला अडवून डोक्यात धारदार वस्तूने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी (२२ मे) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ताज बेकरीमागील गल्लीत घडला.

सौदागर हरिदास शिंदे (२०, रा. पिंपरी), राजेंद्र विटकर (रा. पिंपरी) आणि शिवड्या (रा. पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मिलिंद शाहूराव चाबुकस्वार (२८, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद हे पायी कामावर जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. “तू इथल्या पोरांसोबत का राहतोस?” अशी विचारणा करत आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी मिलिंद यांना ढकलून अ‍ॅक्टिव्हावर पाडले. यातील एका आरोपीने धारदार वस्तूने त्यांच्या डोक्यात वार केला. यात मिलिंद गंभीर जखमी झाले. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.

शेअर करा