Chatrpati Sambhajinager : एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा प्रश्नच नाही, ते नाराज झाले तर स्फोट होतो!' ; मंत्री उदय सामंत आणि बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण
Chatrpati Sambhajinager :छत्रपती संभाजीनगर :- राज्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून राज्याच्या विविध भागांत पाहणी दौरे सुरू आहेत.
1 मिनिट वाचन

Chatrpati Sambhajinager : दुष्काळ निवारण बैठकीत डावलल्याच्या चर्चा फेटाळल्या; विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह सेट केल्याचा आरोप
Chatrpati Sambhajinager :छत्रपती संभाजीनगर :- राज्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून राज्याच्या विविध भागांत पाहणी दौरे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक राज्यात आल्यानंतर त्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली नव्हती तसेच दुष्काळ निवारण बैठकीला निमंत्रण न दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वेगाने रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत आणि आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत नाराजीचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे.https://maharashtramirror.com/ Chatrpati Sambhajinager
एकनाथ शिंदेंच्या डिक्शनरीमध्ये 'नाराजी' हा शब्दच अस्तित्वात नाही, ते जे काही करतात ते नेहमी खुल्या मनाने करतात, असे स्पष्ट करत मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे दरे गावात गेले किंवा दिल्लीत गेले तरी काहींच्या पोटात दुखू लागते, हा विरोधकांचा कायमस्वरूपी डाव असून ते जाणीवपूर्वक 'फेक नरेटिव्ह' सेट करत आहेत, असे ते म्हणाले. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि इतर महत्त्वाच्या बैठकांमध्येही व्यस्त असू शकतात, त्यामुळे केवळ एका बैठकीला उपस्थित राहिले नाहीत म्हणजे त्यात नाराजीचा संबंध जोडणे चुकीचे असून अशा तथ्यहीन बातम्यांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार बच्चू कडू यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे अजिबात नाराज नसल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे कुठेही नाराज नसून ते पूर्णपणे खुश आहेत, याबाबत स्वतः आपली त्यांच्याशी चर्चा झाल्याचे कडू यांनी सांगितले. मोठे नेते नाराज झाल्यानंतर त्याचा मोठा स्फोट होत असतो, त्यामुळे ते अजिबात नाराज नाहीत; कदाचित त्यांच्याकडे इतर काही महत्त्वाचे काम असेल म्हणूनच ते या बैठकीला उपस्थित राहिले नसतील, असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले.




