मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Eknath Shinde : "गॅस टंचाईची भीती पसरवून साठेबाजांचे फाते करू नका"; पंतप्रधान भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार

Eknath Shinde And Shivsena Member Meet PM Modi In Delhi : दिल्ली दौऱ्यात इराण-इस्रायल युद्धावर चर्चा; 'ऑपरेशन सिंदूर'चा दाखला देत विरोधकांच्या राजकारणावर ओढले ताशेरे

V
Vivek

2 मिनिट वाचन

Eknath Shinde : "गॅस टंचाईची भीती पसरवून साठेबाजांचे फाते करू नका"; पंतप्रधान भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार

Eknath Shinde And Shivsena Member Meet PM Modi In Delhi : दिल्ली दौऱ्यात इराण-इस्रायल युद्धावर चर्चा; 'ऑपरेशन सिंदूर'चा दाखला देत विरोधकांच्या राजकारणावर ओढले ताशेरे

नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशातील गॅस टंचाई, इराण-इस्रायल युद्ध आणि विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. "युद्धजन्य परिस्थितीत राजकारण करण्याऐजी सर्व पक्षांनी एकसंघ राहून पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

पंतप्रधान मोदींशी 'या' विषयांवर झाली चर्चा

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांकडे महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्नांसह आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही सविस्तर चर्चा केली.

इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावावर चर्चा झाली. दुबई, मस्कत आणि कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इराणने होर्मुझमधून ताब्यात घेतलेल्या जहाजांबाबत आणि तिथल्या सागरी सुरक्षिततेबाबतही त्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला.देशात इंधन किंवा गॅस सिलिंडरचा तुटवडा भासणार नाही, याची पूर्ण काळजी केंद्र सरकार घेत असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

विरोधकांवर टीकेची तोफ

गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून रान उठवणाऱ्या विरोधकांना शिंदेंनी खडे बोल सुनावले,"विरोधक वारंवार टंचाई आहे असे ओरडून सांगत आहेत, यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होऊन साठेबाजांना आयती संधी मिळते, हे त्यांनी लक्षात घ्यावे," असे शिंदे म्हणाले.

'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळीही विरोधकांनी असेच वर्तन केले होते, असा दाखला देत त्यांनी "पाकिस्तानात हेडलाईन व्हावी म्हणून काही लोक बोलतात, हे दुर्दैवी आहे," असा टोला लगावला.

खासदार श्रीकांत शिंदेंचे कौतुक

या दौऱ्यात शिंदेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संसदेतील वागणुकीचे आणि कामाचे कौतुक केल्याचे उपमुख्यमंत्री अभिमानाने म्हणाले. "श्रीकांतचे सर्वांशी चांगले राजकीय संबंध आहेत आणि तो उत्तम काम करत आहे," असे ते म्हणाले.

ज्योती वाघमारेंना शुभेच्छा

राज्यसभेसाठी संधी दिलेल्या ज्योती वाघमारे यांच्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री भावूक झाले. "ज्योती ताई अतिशय गरिबीतून पुढे आलेल्या उच्चविद्याविभूषित भगिनी आहेत. त्या राज्यसभेत सामान्य जनतेचा आवाज बुलंद करतील आणि आम्ही त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवतील," अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

शेअर करा