मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

बच्चू कडू यांच्याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे, प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

बच्चू कडू यांच्याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे, प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा

पिंपरी: राज्यात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. पिंपरी-चिंचवड बस आगाराच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मराठी भाषेच्या सक्तीबाबत माहिती देताना सरनाईक म्हणाले, "मराठी सक्तीचा नियम राज्य शासनाने १९८९ मध्येच केला होता, आता त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे. १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी आणि कारवाई सुरू होणार आहे. अनेकदा प्रवासी मराठीत बोलतात आणि चालकाला मराठी समजत नाही, यातून वाद होऊन प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतात. हे टाळण्यासाठी चालकांना मराठी येणे अनिवार्य आहे.

"ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे ती शिकावी."

माजी आमदार बच्चू कडू यांच्या विधानपरिषदेवरील संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता सरनाईक म्हणाले की, बच्चू कडू हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांसाठी त्यांनी मोठे काम केले आहे. "अशा कार्यकर्त्याला विधानपरिषदेवर संधी देण्याचा निर्णय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील. त्यांचा निर्णय आमच्या पक्षात अंतिम असतो आणि त्यात काहीही चुकीचे नाही," असेही सरनाईक म्हणाले.

शेअर करा