मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

एकल महिलांना पुण्यधाम ट्रस्ट संचलीत पुण्यधाम आश्रम पुणे यांनी रब्बीच्या पेरणीसाठी हरभरा बियानांचे वाटप

एकल महिलांना पुण्यधाम ट्रस्ट संचलीत पुण्यधाम आश्रम पुणे यांनी रब्बीच्या पेरणीसाठी हरभरा बियानांचे वाटप

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

एकल महिलांना पुण्यधाम ट्रस्ट संचलीत पुण्यधाम आश्रम पुणे यांनी रब्बीच्या पेरणीसाठी हरभरा बियानांचे वाटप

कळंब - दि.०७/११/२०२५ रोजी धाराशिव जिल्ह्यातील 500 पूरग्रस्त विधवा, परितक्ता, एकल महिलांना पुण्यधाम ट्रस्ट संचलीत पुण्यधाम आश्रम पुणे यांनी रब्बीच्या पेरणीसाठी हरभरा बियानांचे वाटप दि. 06 नोव्हेंबर रोजी पर्याय सामाजिक संस्था हसेगाव (के) येथे करण्यात आले, पुण्यधाम च्या माता कृष्ण कश्यप आणि पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुण्यधाम धाम चे ट्रस्टी गणेश कामठे म्हणाले की, आपण समाजाचे कांही तरी देणे लागतो त्यामुळं आज आपण संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे आश्रू पुसले पाहिजेत असे वाटले आणि या बियाणे वाटपाचे काम हाती घेतले, आपण शेतकरी या जगाचे पोशिंदे आहोत, आपण कोणापुढेही हात पसरणारे नाहीत, आम्ही या पुढे सुद्धा पुण्यधाम कडून 1000 टक्के मदत करू असे सांगितले, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाम मरळ, सूर्यकांत कामठे, निलेश काकडे हे उपस्थित होते.
पर्याय चे कार्यवाहक विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी अध्यक्षीय भाषण केले, बाळासाहेब धस, विलास गोडगे, सुनंदा खराटे यांनी मार्गदर्शन केले तसेच ऋषिकेश तोडकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिताताई तोडकर, भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे, परमेश्वर गवारे, विकास कुदळे, प्रमिला राख, आनंद जाधव, कल्पना जतकर, अश्विनी काकडे, निकिता चंदनशिवे, शकुंतला गोडगे, जयश्री कोठावळे, रियाज शेख, अशोक शिंदे, अजहर तुटके, दिगंबर लडके यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा