मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

EDUCATION : सिंहगड इन्स्टिट्यूट नऱ्हे कॅम्पसमध्ये, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा

EDUCATION- कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलनाचा इशारा

PK
Pratiksha Kate

2 मिनिट वाचन

EDUCATION : सिंहगड इन्स्टिट्यूट नऱ्हे कॅम्पसमध्ये, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा

EDUCATION : सिंहगड इन्स्टिट्यूट व्यवस्थापनाविरोधात बाळासाहेब भुजबळ यांचा आंदोलनाचा इशार

EDUCATION : सिंहगड इन्स्टिट्यूटच्या नऱ्हे कॅम्पसमध्ये भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने अधिकृत वार्ताफलकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या वार्ताफलकाच्या माध्यमातून संस्थेतील कर्मचारी आणि कामगारांना संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती, कामगार कायदे, शासनाच्या योजना, संघटनेचे निर्णय आणि कर्मचारी हिताशी संबंधित घडामोडी नियमितपणे उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमाला भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सचिन मेंगाळे, पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, पुणे जिल्हा संघटन मंत्री उमेश विश्वाद यांच्यासह सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचारी, सभासद आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(EDUCATION)

Pune Sports News : विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बाळासाहेब भुजबळ यांनी सिंहगड ग्रुपमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चिंता व्यक्त केली. कर्मचाऱ्यांना नियमित वेतन, भविष्य निर्वाह निधी (PF), महागाई भत्ता आणि ग्रॅज्युइटी यांसारखे कायदेशीर हक्क वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.(EDUCATION)

भुजबळ यांनी आरोप केला की, संस्थेतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये गेल्या २० महिन्यांपासून नियमित वेतन न मिळणे, सन २०१६ पासून भविष्य निर्वाह निधी अंशदानाची रक्कम संबंधित खात्यात जमा न होणे, सातव्या वेतन आयोगानुसार देय महागाई भत्ता न मिळणे तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युइटी रखडणे या मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला.

कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मूलभूत आणि कायदेशीर अधिकारांशी संबंधित असल्याचे सांगत त्यांनी प्रशासन, व्यवस्थापन आणि संबंधित शासकीय विभागांनी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. अन्यथा कर्मचारी हितासाठी भारतीय मजदूर संघाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.(EDUCATION)

भारतीय मजदूर संघ कर्मचारी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून न्याय्य हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Pune Police : ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत धडक कारवाई; मटका अड्डे उद्ध्वस्त, १५.८० ग्रॅम ‘एमडी’ अमली पदार्थ जप्त

यापूर्वी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कोंढवा कॅम्पसमध्ये भारतीय मजदूर संघाच्या वार्ताफलकाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर नऱ्हे कॅम्पसमध्येही संघटनात्मक कामाला वेग आला असून मोठ्या संख्येने कर्मचारी संघटनेशी जोडले जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमात कामगार हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा, न्याय्य वेतन, सुरक्षित कामाचे वातावरण आणि संघटित शक्तीचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय मजदूर संघ हा केवळ मागण्यांसाठी संघर्ष करणारा संघ नसून "राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित" या तत्त्वांवर कार्य करणारी संघटना असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.(EDUCATION)

Prisoner Reform Programs : ‘बाप्पा’ च्या निर्मितीतून सकारत्मकतेचा श्रीगणेशा

नऱ्हे कॅम्पसमधील वार्ताफलकामुळे कर्मचारी आणि संघटना यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल, तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि सूचना संघटनेपर्यंत जलद पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.(EDUCATION)

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा