Prisoner Reform Programs : ‘बाप्पा’ च्या निर्मितीतून सकारत्मकतेचा श्रीगणेशा
पुणे, महाराष्ट्र मिरर Prisoner Reform Programs : कळत - नकळतपणे हातून गुन्हा घडला आणि त्याची शिक्षा भोगत असताना आजूबाजूला सर्व नकारात्मक वातावरण.
2 मिनिट वाचन

येरवडा कारागृहातील बंदी बांधवासाठी कार्यशाळेचे आयोजन
पुणे, महाराष्ट्र मिरर Prisoner Reform Programs : कळत - नकळतपणे हातून गुन्हा घडला आणि त्याची शिक्षा भोगत असताना आजूबाजूला सर्व नकारात्मक वातावरण. अशा वातावरणातून त्यांना बाहेर काढून त्यांच्या आयुष्यात सकारत्मकतेचा श्रीगणेशा निर्माण करण्याचा प्रयत्न येरवडा मध्यवर्ती कारागृहात संपन्न झाला. कारागृहातील बंदी बांधवांना पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि ते ही बाप्पाची मूर्ती बनविण्यात मग्न झाले होते.Prisoner Reform Programs

महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान- पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने येरवडा कारागृहातील बंदी बांधवांसाठी पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे ेआयोजन करण्यात आले होते. या बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी गेल्या बारा वर्षोंपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांचे चिरंजीव युवा शिल्पकार विराज खटावकर यांनी या कार्यशाळेत बंदी बांधवांना पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत या बांधवांनी माती मळण्यापासून ते प्रत्यक्ष गणपती मूर्ती बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे सहभाग घेतला.Prisoner Reform Programs

महाराष्ट्र कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, कारागृह, कागारगृह उपमहा निरीक्षक योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, तुरुंग अधिकारी शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखानर ही कार्यशाळा संपन्न झाली.
या प्रकल्पाचे समन्वयक आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या बांधवांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्या हातून चांगले काम करून घेण्याच्या उद्दिष्टाने प्रेरणापथ प्रकल्प कार्यरत आहे. त्याला समाजाच्या विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.Prisoner Reform Programs

शिल्पकार विवेक खटावकर म्हणाले, या बंदी बांधवांमध्ये असलेल्या ऊर्जेला आणि कलात्मकतेला योग्य मार्ग आणि वळण मिळाले तर त्यांच्या हातून अनेक चांगल्या कलाकृती घडू शकतील . त्याची सुरुवात या कार्यशाळेतून झाली आहे. तसेच, माझ्या कला जीवनातल्या प्रवासातला हा अविस्मरणीय दिवस असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत शिल्पकार शशिकांत राहूकर, अमित कलाल, रोहित गोळे, कागद काम निर्देशक पुंडलिक खलोलकर, शुभम मेदनकर, प्रवीण सोनवणे, संजय मोरे यांनी मार्गदर्शन केले.Prisoner Reform Programs

तुरुंग अधिकारी शिवाजी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षक नामदेव शिंदे गुरुजी यांनी आभार मानले.
या मूर्तींची खरेदी करावी
बंदी बांधवांनी बनवलेल्या गणेश मूर्ती समाजातील विविध मान्यवरांनी खरेदी करून या मंडळींच्या वेगळ्या आयुष्याची सुरुवात करावी असे आवाहन महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले.Prisoner Reform Programs




