मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : मंगळवारी दसरा साजरा होणार; दुपारी २.१९ ते ३.०६ विजय मुहूर्तमहानवमी, विजयादशमी आणि नवरात्रोत्थापन २० ऑक्टोबर रोजी

Pune News :पुणे - विजयाचे प्रतीक मानला जाणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण मंगळवारी,(दि.२०) साजरा करण्यात येणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

मंगळवारी दसरा साजरा होणार; दुपारी २.१९ ते ३.०६ विजय मुहूर्तमहानवमी, विजयादशमी आणि नवरात्रोत्थापन २० ऑक्टोबर रोजी
मंगळवारी दसरा साजरा होणार; दुपारी २.१९ ते ३.०६ विजय मुहूर्तमहानवमी, विजयादशमी आणि नवरात्रोत्थापन २० ऑक्टोबर रोजी

Pune News :पुणे - विजयाचे प्रतीक मानला जाणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण मंगळवारी,(दि.२०) साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी महानवमी आणि नवरात्रोत्थापनही होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी दुपारी २ वाजून १९ मिनिटे ते ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त असल्याची माहिती पंचांगानुसार देण्यात आली आहे. हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. प्रभू श्रीरामांनी रावणावर मिळवलेला विजय आणि देवी दुर्गेने महिषासुराचा केलेला वध यांचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. दसरा हा सत्याचा असत्यावर, चांगुलपणाचा वाईटावर आणि न्यायाचा अन्यायावर विजय मिळवण्याचा संदेश देणारा सण मानला जातो.https://maharashtramirror.com/ Pune News

नवरात्रोत्सवाची सांगता दसऱ्याच्या सणाने होत असल्याने या दिवशी देवीची पूजा, शस्त्रपूजन, वाहनपूजन तसेच आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी नवीन कामांचा शुभारंभ, खरेदी आणि व्यवसायाची सुरुवात करण्यासाठीही दसऱ्याचा दिवस शुभ मानला जातो. विजय मुहूर्तामध्ये पूजा-अर्चा करून विजयादशमी साजरी करतात. श्रद्धा, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात दसरा साजरा करण्यात येतो. “यंदा महानवमी आणि विजयादशमी एकाच दिवशी आल्याने भाविकांनी सकाळी देवीची पूजा करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर नवरात्रोत्थापन करून दसरा पूजन करावे. सर्व धार्मिक विधी आपल्या घरातील परंपरेनुसार आणि पंचांगातील शुभमुहूर्तानुसार करावेत.”

— श्रीधर व्यास, पौरोहित्य गुरूजी

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा