मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पुण्यात 'डबल' कारवाई! - हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; युगांडाच्या महिलेसह स्पा मॅनेजरला अटक

Pune Sex Racket Busted Latest News : मुंढव्यात पर्यटक व्हिसावर आलेल्या परदेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय; हडपसरमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; चार पीडित महिलांची सुटका

V
Vivek

1 मिनिट वाचन

पुण्यात 'डबल' कारवाई! - हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; युगांडाच्या महिलेसह स्पा मॅनेजरला अटक

Pune Sex Racket Busted Latest News : मुंढव्यात पर्यटक व्हिसावर आलेल्या परदेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय; हडपसरमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; चार पीडित महिलांची सुटका

पुणे :- पुणे शहरात पोलिसांनी Pune Police एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी कारवाई करत वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे शहरभरात खळबळ उडाली असून, युगांडाच्या एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एकूण चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. Pune Latest Crime News

मुंढवा येथील परदेशी रॅकेट उघड

मुंढवा येथील दळवी हाईट्समधील एका सदनिकेत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सराह फिओना नागोबी (मूळ युगांडा) या महिलेला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, युगांडा देशातील तीन परदेशी महिलांकडून येथे वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. या महिला भारतात पर्यटक व्हिसावर आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुंढवा पोलिसांनी आरोपी आणि पीडित महिलांचे पासपोर्ट पुढील तपासणीसाठी एफआरओ विभागाकडे पाठवले आहेत. Pune Mundhwa Sex Racket Latest News

हडपसरमध्ये स्पा सेंटरचा गैरवापर

दरम्यान, हडपसर पोलिसांनीही पुणे-सोलापूर रोडवरील रविदर्शन चौकातील अग्रवाल कॉर्नर येथील 'युनिक स्पा' सेंटरवर कारवाई केली. स्पाच्या नावाखाली येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छाप्यात मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांची नावे सौरभ शामराव इंगळे आणि राहुल संजीव देवनाथ अशी आहेत. पोलिसांनी या ठिकाणाहून एका पीडित महिलेची सुटका केली असून, दोघांना अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

पुणे पोलिसांनी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील अवैध व्यवसायांवर केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी भीती पसरली आहे.

शेअर करा